जि.प.मध्ये नोकर भरतीचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: August 20, 2014 23:16 IST2014-08-20T23:16:28+5:302014-08-20T23:16:28+5:30
जिल्हा परिषदेतील विविध रिक्त पदांची भरती प्रकियेचा राज्य शासनाने अडसर दूर केला आहे. मात्र हा निर्णय घेताना शासनाने भरती प्रकियेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त काढला आहे.

जि.प.मध्ये नोकर भरतीचा मार्ग मोकळा
शासनाचे आदेश : नोव्हेंबरमध्ये होणार प्रकिया
अमरावती : जिल्हा परिषदेतील विविध रिक्त पदांची भरती प्रकियेचा राज्य शासनाने अडसर दूर केला आहे. मात्र हा निर्णय घेताना शासनाने भरती प्रकियेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त काढला आहे.
राज्य शासनाने काही महिन्यापूर्वीच शासकीय नोकर भरतीवर स्थगिती दिली होती. परिणामी यंदा जून, जुलै महिन्यात होणारी जिल्हा परिषदेची नोकर भरती लोकसभा निवडणुकीमुळे अडचणीत सापडली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येत नाही तर काही दिवसांत पुन्हा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू झाली. २४ जून रोजी ही आचारसंहिता संपली. हा प्रकार थांबताच मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर केले. त्यामुळे सर्वच जिल्हा परिषदांकडून आरक्षणनिहाय नोकर भरतीबाबत रिक्त जागांची माहिती शासन स्तरावरून मागविण्यात आली. ही माहिती पोहचताच शासनाने ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ेनोकर भरती प्रकियेवरील स्थगिती उठवून जाहिरात आचारसंहिता लागण्यापूर्वी वर्तमान पत्रात प्रसिध्दीचे आदेश दिले आहेत. याशिवाय नोकर भरतीसाठी उमेदवारांकडून अर्जही स्वीकारावे. परंतु भरती प्रकियेसंबंधी लेखी परीक्षा विधानसभा निवडणुकीनंतर घेण्याच्याही सूचना या शासन निर्णयात देण्यात आहेत. या निर्णयामुळे मागील दोन महिन्यांपासून रखडलेल्या नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)