्रपाच लाख रुपयांची दारु जप्त

By Admin | Updated: September 24, 2015 00:25 IST2015-09-24T00:25:54+5:302015-09-24T00:25:54+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी परतवाडानजीक वडुरा शेतशिवारात बनावट देशी व विदेशी दारुचा साठा गोदामातून जप्त केला.

Only Rs 5 lakh cash seized | ्रपाच लाख रुपयांची दारु जप्त

्रपाच लाख रुपयांची दारु जप्त

परतवाड्यातील घटना : एकाच ठिकाणावर दोन विभागाच्या दोन धाडी
अचलपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी परतवाडानजीक वडुरा शेतशिवारात बनावट देशी व विदेशी दारुचा साठा गोदामातून जप्त केला. परतवाडा पोलिसांनी ज्या ठिकाणावरुन दीड लाखांचा दारूसाठा जप्त केला तेथे धाड टाकून उत्पादन शुल्क विभागाने पाच लक्ष रुपयांची दारु पकडली व आरोपीला अटक करण्यात आली.
वडुरा शेतशिवारात मंगळवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून मध्यप्रदेशात विक्री होत असलेल्या मॅक्डॉल्स, व्हिस्की कंपनीच्या १८० मिली क्षमतेच्या ३६ पेट्या २२४ बॉटल्स व अवैध देशी संत्रा १३० पेट्या तसेच तीन दुचाकी जप्त केल्यात. मुद्देमालास ६ लक्ष ३ हजार २९४ एवढी किंमती आखण्यात आली आहे. यात जवळपास दोन हजार कागदी लेबल बनावट दारुसाठी वापरण्यात असल्याचे आढळून आले. तर मयुर सुभाष कानेकर (२१) जुनी वस्ती कांडली याला अटक करण्यात आली. त्यावर मुंबई दारुबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
बनावट लेबल दोन राज्यांत विक्री
गणपती व ईदनिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारु विक्रीविरुद्ध मोहीम राबविली. यामध्ये बनावट दारु दोन हजार कागदी लेबल सापडले असून मध्यप्रदेश व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ती विक्री करण्याचे नमुद आहेत. दोन्ही राज्याचा महसूल बुडविण्याचा मुख्य हेतू असल्याचा आरोपीचा उद्देश असला तरी बनावट दारु विषारीसुध्दा असू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. पकडण्यात आलेला आरोपी हा मुख्य सूत्रधार नसून मुख्य आरोपींचा शोेध घेण्याची मोठी जबाबदारी या विभागाची आहे. (तालुका प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी सकाळीच धडकले
राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाच लक्ष रुपयांची बनावट दारू पकडण्याची माहिती तत्काळ पहाटे ४ वाजता जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना देण्यात आली. त्यावर जिल्हाधिकारी सकाळी ८ वाजता परतवाडा येथे धडकले. त्यांच्यासोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर येथील विभागीय आयुक्त उषा वर्मा होत्या. ही कारवाई अचलपूरचे निरीक्षक सुबोधकुमार केडिया, शरद लांडगे, दुय्यम निरीक्षक शैलेश अजमिरे, शेख अनिस, शंकर इंदये, शीतलकुमार बेदरकर, राजेश तायकर, रवी राऊ तकर, अरविंद नांदणे, अंकुश काळे, सुमित काळे, जगदीश चव्हाणसह आदी कर्मचाऱ्यांनी केली.

Web Title: Only Rs 5 lakh cash seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.