दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST2021-04-08T04:13:54+5:302021-04-08T04:13:54+5:30
अमरावती : जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी दोन लाखांच्यावर लसींचा साठा उपलब्ध होता. मात्र, हल्ली लसीकरणाने वेग घेतल्याने आता केवळ दोन ...

दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा
अमरावती : जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी दोन लाखांच्यावर लसींचा साठा उपलब्ध होता. मात्र, हल्ली लसीकरणाने वेग घेतल्याने आता केवळ दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याची माहिती आरोग्य विभागाने आहे.
आरोग्य विभागाने लसींचा साठा उपलब्ध करुन दिला नाही तर जिल्ह्यातील लसीकरणाला ब्रेक लागेल, असे संकेत देण्यात आले आहे. आतापर्यंत आराेग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात आली आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली. जिल्ह्याची २८ लाख लोकसंख्या असून, लसीकरण झाल्याची टक्केवारी ही कमी आहे. मात्र, शासनाने कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता सोमवारी रात्री ८ वाजतापासून लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे कोरोना महामारीचे संकट उभे असल्याचे स्पष्ट होते. अशातच कोरोना प्रतिबंध लसीकरणाला गत दोन दिवसांपासून वेग आला आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. शासकीय आणि खासगी अशी ७३ केंद्र लसीकरणांसाठी निर्माण करण्यात आले आहे.
--------------
जिल्ह्यात एकूण लस साठा :२०१२४०
कोव्हॅक्सिन- ३३३१४
कोविशिल्ड- १६७३८०
------------------
झालेले लसीकरण
आरोग्य कर्मचारी : २७३१४
फ्रंट लाईन वर्कर: २३०५४
ज्येष्ठ नागरिक: ११९५२१
--------------
कोट
आरोग्य विभागाकडे जिल्ह्यासाठी साडेचार लाख लसी साठ्यांची मागणी केली आहे. आता दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा आहे. नियोजन करण्यात येत असून, तुटवडा होऊ नये, यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.
- दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी.
००००००००००००