पोटभाडेकरुंच्या करारनाम्याच्या तपासणीनंतरच ‘स्थायी’त प्रस्ताव
By Admin | Updated: May 23, 2017 00:12 IST2017-05-23T00:12:37+5:302017-05-23T00:12:37+5:30
प्रियदर्शिनी आणि खत्री संकुलातील पोटभाडेकरुंशी झालेल्या करारनाम्याच्या तपासणीनंतरच भाडे करार आणि त्यासंबंधीचे धोरण कसे असावे, ....

पोटभाडेकरुंच्या करारनाम्याच्या तपासणीनंतरच ‘स्थायी’त प्रस्ताव
आयुक्त खंबीर : ६० रुपये चौरस फूट दर निश्चित
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रियदर्शिनी आणि खत्री संकुलातील पोटभाडेकरुंशी झालेल्या करारनाम्याच्या तपासणीनंतरच भाडे करार आणि त्यासंबंधीचे धोरण कसे असावे, याबाबतचा सर्वंकष प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला जाणार आहे. सोमवारी प्रशासन याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर करेल, असे रविवारच्या बैठकीत ठरविण्यात आले होते. तथापि सोमवारी असा प्रस्ताव देण्यात आला नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी धोरणात्मक निर्णयाचा प्रस्ताव स्थायीकडे जाण्याचे संकेत आहेत.
जवाहर गेट मार्गावरील खत्री कॉम्प्लेक्स आणि जयस्तंभ चौकातील प्रियदर्शीनी संकलातील एकूण २६८ दुकाने महापालिकेच्या बाजार परवाना विभागाने सील केल्यानंतर प्रशासन विरुद्ध पदाधिकारी असा सामना रंगला आहे. प्रियदर्शीनी संकुलातील १६८ पैकी १०६ तर खत्री कॉम्प्लेक्समधील २८५ दुकानांपैकी १०६ करारनामे अनधिकृत असल्याची बाब प्रशासनाने आमसभेत स्वीकारली होती. यातील अनेक मूळ गाळेधारकांनी पोटभाडेकरु ठेवल्याची बाब निष्पन्न झाल्यानंतर आणि करारनामेच अनधिकृत ठरविल्यानंतर आता करारनामे कुणाशी करायचे, किती कालावधीसाठी करायचे, भाडे किती असावे, याबाबत नगरसेवकांनी प्रशासनानला धारेवर धरले होते. त्याअनुषंगाने पूर्वीच्या १ रुपये चौरसफुट दराच्या तुलनेत नव्याने ७० ते ८० टक्के दरवाढ केली जाईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली होती. महापालिकेने बीओटी तत्त्वावर शहरातील २७ संकुलातील सुमारे ११०० दुकानाच्या वितरणासाठी नवे धोरण प्रशासन अंगिकारणार आहे. आता नव्याने करारनामे करुन जी दुकाने भाडेतत्वावर दिली जातील. दरम्यान यासंदर्भात एडीटीपीने ठरवून दिल्याप्रमाणे संकुलातील गाळेधारकांकडून ६० रुपये प्रतिचौरस फुट दर आकारला जाईल.
आयुक्तांवर दबावतंत्राचा वापर
महापालिकेने मेगा कारवाई करुन तब्बल २६८ दुकांनांना सील लावण्याने व्यावसायिकांत मोठी खळबळ माजली आहे.एक रुपयांएैवजी ६ रुपये चौरस फुटाचा पर्यायही व्यापाऱ्यांनी दिला आहे.त्यासाठी महापालिका आयुक्तांवर राजकीय दबाव आणण्याचा जोरदार प्रयत्न केला जात आहे.मात्र आयुक्त उत्पन्न वाढविण्याच्या भूमिकेवर ठाम असून त्यांच्या या कणखर भूमिकेला अमरावतीकरांनी पाठिंबाही दर्शविला आहे.राजकमल चौकासारख्या शहरातील हलद्यस्थानी असलेल्या खापर्डे संकुलातील दुकाने १ रुपये चौरस फुटाएैवजी बाजारभावाप्रमाणे द्यावीत,ही पमशासनाची भुमिका योग्य असल्याचे मत अनेकजण व्यक्त केले जात आहे.