आरटीईसाठी तीन दिवसात केवळ ३४ तात्पुरते प्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:16 IST2021-06-16T04:16:43+5:302021-06-16T04:16:43+5:30

अमरावती : कोरोनामुळे राज्यभरातील आरटीई प्रवेश प्रक्रिया एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली आहे. जिल्ह्यात दोन दिवसात आरटीईचे २ हजार ...

Only 34 temporary admissions in three days for RTE are guaranteed | आरटीईसाठी तीन दिवसात केवळ ३४ तात्पुरते प्रवेश निश्चित

आरटीईसाठी तीन दिवसात केवळ ३४ तात्पुरते प्रवेश निश्चित

अमरावती : कोरोनामुळे राज्यभरातील आरटीई प्रवेश प्रक्रिया एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली आहे. जिल्ह्यात दोन दिवसात आरटीईचे २ हजार ०७६ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३४ विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश निश्चित झाले आहेत.

आरटीई सोडतीत पात्र ठरलेल्या १९८० विद्यार्थ्यांचे प्रवेशानंतर उर्वरित निवड यादीतील विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत प्रवेश निश्चित करावयाचा आहे. त्यानंतर प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठीची सोडत ७ एप्रिलला काढण्यात आली होती. त्यात जिल्ह्यातील १९८० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले. मात्र त्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधामुळे प्रवेश प्रक्रिया स्थगित करावी लागली. आता हा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर ११ जूनपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बॉक्स

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे

सोडतीत प्रवेश झालेल्या मुलांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन पाल्यांचा तात्पुरता प्रवेश द्यायचा आहे.

शाळांनी पालकांना प्रवेशासाठी तारखा द्याव्यात आणि आरटीई प्रवेश सुरु झाल्याची माहिती शाळेच्या प्रवेशव्दारावर लावली.

निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा कालावधी संपल्यानंतर रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे, त्याबाबतच्या सूचना आरटीई संकेतस्थळावर दिल्या जातील अशी शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

बॉक्स

३४ जणांचे तात्पुरते प्रवेश निश्चित

अमरावती जिल्ह्यातील २४४ शाळांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदविला. या शाळेतील राखीव असलेल्या २०७६ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून पहिल्या फेरीत १९८० विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आहे. दरम्यान प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन तीन दिवसांत ३४ विद्यार्थ्यांनी तात्पुरते प्रवेश करून घेतले आहेत.

Web Title: Only 34 temporary admissions in three days for RTE are guaranteed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.