शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

१००‘कोरोना’ पॉझिटिव्ह पैकी पाच जणांनाच धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 5:00 AM

पाच रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळत असल्याने त्यांना तातडीने उपचार घेणे गरजेचे असते. जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळलेला नाही, हे विशेष. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

ठळक मुद्देजिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही : श्यामसुंदर निकम यांची माहिती

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘कोरोना’ व्हायरसचा संसर्ग झालेल्या १०० पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८१ रुग्ण साधारण असतात, त्याचा कुठलाही धोका नसतोे. १४ जणांमध्ये त्याची सोम्य लक्ष्णे आढळतात. मात्र, काळजी घ्यावी लागते. परंतु पाच रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळत असल्याने त्यांना तातडीने उपचार घेणे गरजेचे असते. जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळलेला नाही, हे विशेष. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.एखादी व्यक्ती जर ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आली असेल व त्यानंतर त्याला ताप, सर्दी, खोकला, अशी लक्षणे आढळून येत असतील तर त्याने तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करावी. अशा रुग्णांचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीकरिता नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात येतात. परंतु कुठलाही व्यक्ती जर ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात नसेल व त्याला साधारण ताप सर्दी, खोकला, अशी लक्षणे असतील तर त्यांनी घाबरू नये. आतापर्यंत चारजण विदेशातून परतले. त्यापैकी तीन जण चीनमधून, तर एक हाँगकाँगहून आले आहे. पैकी दोघांना सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे आढळल्याने त्यांचे ‘थ्रोट स्वॅब’ पुणे व नागपूर येथे पाठविले होते. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. २९ जानेवारीचा स्वॅब पुणे येथे, तर १० फेब्रुवारीचा स्वॅब नागपूर येथे पाठविले होते. चारही नागरिकांना १४ दिवस त्यांच्या घरी वैद्यकीय निगराणीत ठेवले होते. ‘कोरोना’ संशयित रुग्णांकरिता इर्विनमध्ये आयसोलेशन कक्ष स्थापन करण्यात आला आहे.गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळाजिल्ह्यात जरी एकही ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसला तरी खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. शिंकताना किंवा खोकलताना तोंडावर रुमाल ठेवावा. खुर्ची, टेबल किंवा इतर वस्तुनांना हात लागत असल्याने हात नेहमी स्वच्छ धुवावे. ताप, सर्दी, खोकला असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करून घ्यावी. यामध्ये नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे असून, शक्यतोवर हस्तांदोलन करण्याचे टाळावे.संशयितांची लक्षणेएखादी व्यक्ती जर ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आली असेल व त्याला ताप, खोकला, किंवा सर्दी अशी लक्षणे असतील तर ती ‘कोरोना’ संशयित रुग्णांची लक्षणे मानली जातात. त्यांनी तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावून थ्रोट स्वॅप तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामध्ये संशयित असला तरी पण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे स्वॅप तपासणी नंतरच ठरते.‘कोरोना’ व्हायरस आठ तास राहतो वातावरणात‘कोरोना’ हा व्हायरस साधारणत: आठ तास वातावरणात जिवंत राहतो. त्यामुळे त्याचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असतो. पॉझिटिव्ह रुग्ण शिंकताना त्याने रुमालाला हात लावल्या तो हात तो ज्या ठिकाणी लागेल, उदा. खुर्ची, बायोमेट्रिक, टेबल, इतर वस्तूला दुसऱ्याने हात लावल्यास त्यालासुद्धा संसर्गाचा धोका असतो. याचा प्रादुर्भाव हवेतून सुद्धा होतो, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात एकही ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. चार नागरिक विदेशातून जिल्ह्यात आले होते. त्यापैकी दोन संशयितांचे थ्रोट स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या आजारात १०० पॉझिटिव्ह रुग्णांपैैकी फक्त पाच जणांनाच तीव्र स्वरुपाचा धोका राहू शकतो. जिल्ह्यात कुठलाही रुग्ण नसल्याने नागरिकांनी घाबरू नये, पण खबरदारी व सतर्कता बाळगली पाहिजे.- श्यामसुंदर निकम, जिल्हाशल्यचिकित्स अमरावती

टॅग्स :corona virusकोरोना