अभियांत्रिकीच्या ऑनलाईन परीक्षा २२ मार्चपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST2021-03-13T04:22:39+5:302021-03-13T04:22:39+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न २३ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या हिवाळी २०२० ऑनलाईन परीक्षा २२ मार्च २०२१ पासून घेण्यात ...

अभियांत्रिकीच्या ऑनलाईन परीक्षा २२ मार्चपासून
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न २३ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या हिवाळी २०२० ऑनलाईन परीक्षा २२ मार्च २०२१ पासून घेण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने परीक्षा विभागाने १० मार्च रोजी परिपत्रक जारी केले.
कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या परीक्षांना प्राधान्य दिले आहे. कोरोना संसगार्मुळे परीक्षांना विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी विद्यापीठ प्रशासनाने घेतली आहे. त्याकरिता नव्याने अभियांत्रिकी सत्र ५, ७ व ८ च्या परीक्षांचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. परीक्षा फाॅर्म भरणे, परीक्षा शुल्क, हॉल तिकीट पाठविणे, परीक्षा आणि मूल्यांकन आदी बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत. एकंदर अभियांत्रिकीचे ३० हजार विद्यार्थी हिवाळी २०२० परीक्षा देतील, अशी माहिती आहे.
------------------
१७ मार्चपासून ‘मॉडरेशन’च्या बैठकी
अभियांत्रिकी परीक्षा वगळता अन्य अभ्यासक्रमांच्या पेपर तपासणीच्या अनुषंगाने १७ मार्चपासून ‘मॉडरेशन’च्या बैठकी सुरू होणार आहेत. यात एस.डी. ठाकूर, प्रदीप देवहाते, एस.व्ही. कोल्हे, व्ही.आर. माटे, डॉ. कुऱ्हाडे, भूपेश नहाने हे सहभागी होणार आहेत.
----------------------
अभियांत्रिकी सत्र ५, ७ व ८ हिवाळी २०२० परीक्षांचे २२ मार्चपासून नियोजन चालविले
आहे. सुमारे ३० हजार विद्यार्थी परीक्षार्थी असतील. परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.
- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ.