सेफला हायस्कूल येथे विज्ञान दिननिमित्त ऑनलाईन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST2021-03-04T04:23:07+5:302021-03-04T04:23:07+5:30
धामणगाव रेल्वे : स्थानिक सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता ...

सेफला हायस्कूल येथे विज्ञान दिननिमित्त ऑनलाईन स्पर्धा
धामणगाव रेल्वे : स्थानिक सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
वक्तृत्व स्पर्धेचा विषय 'भारतीय संस्कृतीचा आधार -विज्ञान' होता. यात १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विज्ञान प्रदर्शनात सहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या सुरुवातीला आठवीच्या प्रतीक्षा भिल व आभासी आठवले यांनी विज्ञान गीत सादर केले. वक्तृत्व स्पर्धेत सातवीची कनक भैया, सहावीची कृतिका पाटील व सातवीची वसुंधरा खेडकर यांनी क्रमांक पटकावले. विज्ञान प्रदर्शनात पाचवीची यामिनी हेंडवे, राजलक्ष्मी फुलढाले व सातवीचा श्लोक बानोडे विजयी ठरले. हायस्कूल विभागातून नववीचा ओजस वानखडे याने प्रथम क्रमांक पटकावला. याप्रसंगी प्राचार्य गणेश चांडक, उपप्राचार्य मनोज हांडे, पर्यवेक्षक गोपाल मुंधडा, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक अनिल लाहोटी, दिनेश महेशगौरी उपस्थित होते. विज्ञान शिक्षक राम बावस्कर आयोजक होते. विनायक कडू यांनी आभार मानले.