ऑनलाईन सीईटी नोंदणी तांत्रिक कारणांनी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST2021-07-24T04:10:31+5:302021-07-24T04:10:31+5:30

अमरावती : दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्यासाठी सुविधा तांत्रिक कारणांनी काही ...

Online CET registration closed due to technical reasons | ऑनलाईन सीईटी नोंदणी तांत्रिक कारणांनी बंद

ऑनलाईन सीईटी नोंदणी तांत्रिक कारणांनी बंद

अमरावती : दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्यासाठी सुविधा तांत्रिक कारणांनी काही दिवस बंद असणार आहे. याबाबत राज्य मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी कळविले आहे.

सन २०२१- २०२२ च्या इयत्ता अकरावी प्रवेशासंदर्भात २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजता सीईटी परीक्षा होणार आहे. या सीईटी परीक्षेसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. २० ते २७ जुलै दरम्यान अकरावी सीईटी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अपेक्षित आहे. मात्र, तांत्रिक कारणांनी हे संकेतस्थळ तूर्त बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्याचा विद्यार्थांना पुरेसा कालावधी लवकरच निश्चित केला जाणार आहे.

Web Title: Online CET registration closed due to technical reasons