आरटीओची आॅनलाईन अपॉईमेंटची सक्ती
By Admin | Updated: December 16, 2014 22:44 IST2014-12-16T22:44:24+5:302014-12-16T22:44:24+5:30
शिकाऊ पाठोपाठ आता कायम वाहन परवान्यासाठी आॅनलाईन अपाईमेंटची सक्ती सुरू झाली आहे. संगणक, इंटननेट साक्षरतेच्या अभावाने आरटीओ कार्यालयाची ही सक्ती सामान्य उमेदवारांची डोकेदुखी बनली आहे.

आरटीओची आॅनलाईन अपॉईमेंटची सक्ती
जितेंद्र दखणे - अमरावती
शिकाऊ पाठोपाठ आता कायम वाहन परवान्यासाठी आॅनलाईन अपाईमेंटची सक्ती सुरू झाली आहे. संगणक, इंटननेट साक्षरतेच्या अभावाने आरटीओ कार्यालयाची ही सक्ती सामान्य उमेदवारांची डोकेदुखी बनली आहे. संधीचा फायदा उठविणाऱ्या कॅफे दुकानदारी मात्र सध्या तेजीत सुरू आहे. सकारात्मक दृष्टीने केलेल्या बदलास आमचा विरोध नाही. पण त्याला ऐच्छिक पर्यायही ठेवा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
परवाना काढण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांचा वेळ, श्रम आणि पैशाची बचत व्हावी, त्याचबरोबर एजंटगिरीला आळा बसावा, या उद्देशाने शासनातर्फे शिकाऊ परवान्यासाठी आॅनलाईन अपॉईटमेंटची सक्ती करण्यात आली. त्याची अंमलबजावणी १ सष्टेंबरपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरूवात झाली. उमेदवाराने आपल्या सवडीप्रमाणे परवान्यासाठी अपॉर्इंटमेंट वेळ घ्यायची त्यानुसार परवान्यासाठीच्या चाचण्या द्यायच्या, हा त्यामागील हेतू होता. पण आज घरोघरी संगणक नाही, तशा प्रकारचे स्मार्ट मोबाईल संच नाहीत, इंटनेट साक्षरतेचे प्रमाण अद्याप अत्यंत कमी आहे. अशा असाक्षर लोकांना आॅनलाईन अपॉर्इंटमेंटचा फार्म भरणे म्हणजे एक दिव्य काम वाटू लागले आहे. वाहनाचा परवाना काढायचा म्हटल्यानंतर आॅनलाईन अपाईमेंट आली, त्यासाठी सामान्य उमेदवारांना नेट कॅफेशिवाय दुसरा पर्याय नाही. नेट कॅफेमधूनही अपार्इंटमेंट घ्येण्याचा आॅनलाईन फॉर्म भरून दिला जातो. त्यासाठी मनमानी रक्कम आकारली जाते.
सध्या कार्यालयाच्या परिसरातल्या छोट्या दुकानांतून मोठ्या प्रमाणावर आॅनलाईन फॉर्म भरूण देण्याची सुविधा उपलब्ध आहे. एरवी शिकाऊ परवान्यासाठी ३० रूपये ते १५० रूपये आकारले जात आहेत, ही फक्त अपॉईमेंट आहे, परीक्षा तुम्हालाच द्यावी लागणार आहे. यात पास झाला, तर शिकाऊ परवाना मिळेल, असे सांगीतले जात आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आरटीओ कार्यालयाकडून सुरू झाली आहे. पक्का परवान्यासाठी आवश्यक कागदपत्राबरोबरच ३११ रूपये शुल्क भरले की, उमेदवाराला पुढील चाचण्या देता येत होत्या. मात्र आता पुन्हा आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची अडचण आहे. या प्रक्रियेसाठी नेट कॅफेकडून खिशाला कितीची कात्रू लागेल, याचा नेम नाही. तसेच उमेदवारांच्या तुलनेत कार्यालयात अधिकाऱ्यांची संख्या नाही. त्यामुळे अपॉईटमेंट कधी मिळेल. चाचणीत अपयश आले तर, पुन्हा नवी अपॉईटमेंट कशी मिळवायची असे विविध प्रश्न सामान्य उमेदवारांसमोर आहेत. आरटीओ कार्यालयात आॅनलाईन फॉर्म भरण्याची सोय नाही. त्यामुळे या सक्तीबाबत पुन्हा विचार करण्यात यावा अथवा ऐच्छिक पर्यायाची सोय उपलब्ध करून द्यावी.