राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त ऑनलाईन उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:17 IST2021-08-28T04:17:15+5:302021-08-28T04:17:15+5:30
अमरावती: राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त २९ऑगस्ट रोजी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करून विविध ऑनलाईन उपक्रम आयोजित केल्याची माहिती क्रीडा उपसंचालक विजय ...

राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त ऑनलाईन उपक्रम
अमरावती: राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त २९ऑगस्ट रोजी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करून विविध ऑनलाईन उपक्रम आयोजित केल्याची माहिती क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी दिली.
विभागीय व जिल्हा क्रीडा कार्यालय, तसेच विविध संस्था, संघटनांच्या सहकार्याने गुगल मीट व झूम माध्यमांद्वारे अनेक क्रीडा उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मेजर ध्यानचंद यांच्या कार्यकर्तृत्वावर माहिती देणा-या जीवनपटाचे प्रदर्शन, गीतगायन, लाठीकाठी, आखाडा प्रात्यक्षिके, मार्शल आर्ट, टोकियो ऑलिंपिकमधील क्षणचित्रे असे अनेक उपक्रम २९ ऑगस्टला सकाळी ६.३० पासून दुपारी ३ वाजता दरम्यान होतील. या उपक्रमाला डॉ. चेतक शेंडे, प्रथमेश सिंग, गायत्री खरे, नीरज डाफ, डॉ. नितीन चव्हाळे, अजय आळशी, मोहन इंगळे, सोनल रंगारी, संघरक्षक बडघे, महावीर धुळकर, मंगेश व्यवहारे, अजय केव्हाळे, दिलीप तिडके, विजय मानकर, विश्वास जाधव, सुभाष गावंडे, संदीप इंगोले, शम्स परवेज, डॉ. अंजली ठाकरे यांचे सहकार्य मिळत आहे.