शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक... अमरावती जिल्हा परिषदेच्या माडीझडप शाळेत एक विद्यार्थी अन्‌ दोन शिक्षक

By गणेश वासनिक | Updated: March 3, 2024 17:42 IST

मेळघाटच्या आदिवासी भागातील भीषण वास्तव; ४०० लोकसंख्या असलेले गाव विकास, पायाभूत सुविधांपासून वंचित

गणेश वासनिक, अमरावती: थोरपुरुष, समाजसुधारकांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे निक्षून सांगितले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी बऱ्यापैकी तरतूद आहे. तरी देखील राज्याच्या ग्रामीण भागातील शाळांचे चित्र फारसे समाधानकारक नाही.असाच काहीसा प्रकार अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या दुर्गभ भागातील जिल्हा परिषदेच्या माडीझडप शाळेत एक विद्यार्थी अन्‌ दोन शिक्षक निदर्शनास आला आहे. 

चिखलदरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलले माडीझडप हे गाव ४०० लोकसंख्येचे आहे. बहुल आदिवासी हे गाव असून, रोजगाराअभावी आदिवासी कुंटुबीय स्थलांतर करीत असल्याचे वास्तव आहे. या स्थलांतरणाचा फटका त्यांच्या मुला-बाळांना बसत असल्याचे दिसून येते. माडीझडप येथील शाळा ही अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आवागड या केंद्राशी जोडलेली आहे. ईयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत या शाळेत वर्ग असून, दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यापैकी एक शिक्षक माडीझडप या गावात मुक्कामी राहतात. तर एक शिक्षक ये-जा करीत असल्याची माहिती आहे. चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषदेची सर्वात कमी तीन विद्यार्थी पटसंख्या असलेली माडीझडप शाळेची नोंद आहे. मात्र,अन्य शाळांमध्ये किमान १० ते १५ विद्यार्थी पटसंख्या आहे.माडीझडप शाळेत तीन विद्यार्थी आहेत. पहिली ते पाचवीपर्यत वर्ग असून, काही दिवसांपूर्वी पालकांनी दोन विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत पाठविले होते. मात्र आता ते दोन विद्यार्थी पुन्हा शाळेत परतले आहेत. सध्या तीन विद्यार्थी, दोन शिक्षण अशी या शाळेची रचना आहेत. - रामेश्वर माळवे, खंडविकास अधिकारी, चिखलदरा.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक