पीडित महिलांसाठी "वन स्टॉप क्रायसेस सेंटर"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 00:07 IST2017-06-07T00:07:09+5:302017-06-07T00:07:09+5:30

संकटग्रस्त महिलांसाठी "वन स्टॉप क्रायसेस सेन्टर"ची स्थापना करण्यात आली.

"One Stop Crisis Center" for afflicted women | पीडित महिलांसाठी "वन स्टॉप क्रायसेस सेंटर"

पीडित महिलांसाठी "वन स्टॉप क्रायसेस सेंटर"

इर्विन रुग्णालयात उद्घाटन : विदर्भातील दुसरे केंद्र, एकाच छताखाली सर्व व्यवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संकटग्रस्त महिलांसाठी "वन स्टॉप क्रायसेस सेन्टर"ची स्थापना करण्यात आली. मंगळवारी सकाळी केंद्र शासनाच्या महिला, बालविकास मंत्रालयाचे प्रधान सचिव बी.बी.बसेशंकर यांच्या हस्ते इर्विन रूग्णालयात "सखी नावाच्या कक्षाचे उद्घाटन झाले.
‘वन स्टॉप क्रायसेस सेंटर’चे पहिले केंद्र नागपूर तर दुसरे केंद्र अमरावतीत स्थापन करण्यात आले आहे. यावेळी विभागीय उपायुक्त एम.डी.बोरखडे, जिल्हा महिला, बालविकास अधिकारी राजश्री कोलखडे, पुणे विभागाचे प्रमोद निकाळजे, प्रसाद ताटे, आयुक्त कार्यालयातील देवेंद्र दलाल, विधी सल्लागार विकास काळे, समुपदेशक भावना ठाकरे, सरंक्षण अधिकारी प्रज्ञा भिमटे, महिला सेलच्या पोलीस उपनिरीक्षक वैशाली काळे उपस्थित होत्या. महिलांवरील लैंगिक हिंसाचार, हुंडाबळी, अ‍ॅसिड हल्ला, बालशोषण, व्यावसायीक शोषण, बालविवाह, मानवी तस्करी, कुमारींचे गर्भपात आदी तक्रारींचे निवारण एकाच केंद्रातून केले जाणार आहे. बी.बी.बसेशंकर यांनी नंतर पोलीस आयुक्त मंडलिक यांची भेट घेतली.

एकाच छताखाली महिलांना सुविधा
केंद्र शासन पुरस्कृत महिला व बालविकास विभागामार्फत संकटग्रस्त महिलांना "सखी" कक्षातील एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संकटग्रस्त महिलांसाठी हे निवारा केंद्र राहणार असून त्यासाठी पाच बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. पीडित महिलांसाठी एकाच ठिकाणी सर्व सोयी असल्याने त्यांना वणवण भटकंती करावी लागणार नाही.

समिती पाहणार कामकाज
संकटग्रस्त महिलांच्या समस्या निवारण्यासाठी शासनातर्फे समिती नियुक्त करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हे समितीचे अध्यक्ष राहणार असून त्यांच्या अधिपत्याखाली पोलीस अधीक्षक, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव, वकील संघाचे अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा पंचायत अधिकारी, सिव्हिल सोसायटीचे तीन सदस्य, त्यामध्ये दोन महिला, आयटीडीए व आयटीडीपीचे प्रकल्प अधिकारी कामकाज पाहणार आहेत.

Web Title: "One Stop Crisis Center" for afflicted women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.