धनादेश अनादरप्रकरणी एक महिन्याचा कारावास

By Admin | Updated: September 25, 2015 01:10 IST2015-09-25T01:10:23+5:302015-09-25T01:10:23+5:30

येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्स शाखेस फसविणाऱ्या आरोपीस धनादेश अनादर प्रकरणी १ महिना कारावास

One month imprisonment for defamation of check | धनादेश अनादरप्रकरणी एक महिन्याचा कारावास

धनादेश अनादरप्रकरणी एक महिन्याचा कारावास

अमरावती: येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्स शाखेस फसविणाऱ्या आरोपीस धनादेश अनादर प्रकरणी १ महिना कारावास आणि १,३०,००० रुपये दंड दुसरे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. एस. सहस्त्रबुद्धे यांनी ठोठावला. ज्योतीप्रकाश केवलराम बोधानी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या धनादेश अनादर प्रकरणी न्यायालयीन प्रकरण फौजदारी क्र. ४०६/२०१४ हा आदेश दिला.
ज्योतीप्रकाश बोधानी (रा. निलांबरी अपार्टमेंट, शंकरनगर, अमरावती) याने लघु व मध्यम उद्योग कर्जाच्या रूपाने फिर्यादी कंपनी श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि. च्या अमरावती शाखेतून ४५ लाख रूपये कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड करण्याकरिता ज्योतीप्रकाश केवलराम बोधानी याने फिर्यादी कंपनीस १ लाख २५ हजार ८५० रुपयांचा धनादेश दिला. सदर धनादेश कंपनीने वटविण्यासाठी बँकेत टाकला असता ज्योतीप्रकाश केवलराम बोधानी यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो अनादरीत झाला. दोन्ही पक्षाकडून दाखल साक्षपुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे ज्योतीप्रकाश बोधानी यांना दंड व शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास पुन्हा १० दिवसांची अतिरिक्त कारावासाची शिक्षाही देण्यात आली. या प्रकरणात फिर्यादी कंपनीतर्फे विधिज्ञ प्रतिक पाटील यांनी काम पाहिले.

Web Title: One month imprisonment for defamation of check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.