पुलावरून पडून एकाचा मृत्यू; एक जखमी

By Admin | Updated: June 24, 2017 00:14 IST2017-06-24T00:14:06+5:302017-06-24T00:14:06+5:30

भरधाव वेगाने दुचाकी चालविणाऱ्याचे नियंत्रण सुटल्याने पुलावरून पडून एकाचा मृत्यू, तर एक जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी भिवापूर धरणावर घडली.

One dies from bridge; One injured | पुलावरून पडून एकाचा मृत्यू; एक जखमी

पुलावरून पडून एकाचा मृत्यू; एक जखमी

मृतक चंद्रपूरचा : भिवापूर धरणावर अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
कुऱ्हा : भरधाव वेगाने दुचाकी चालविणाऱ्याचे नियंत्रण सुटल्याने पुलावरून पडून एकाचा मृत्यू, तर एक जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी भिवापूर धरणावर घडली. चरण अंबादास ठेबरे (३५, रा.वरूडा, जि. चंद्रपूर) असे मृताचे व प्रेमदास खेमाजी राठोड (रा.भिवापूर जि.अमरावती) असे जखमीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, जखमी प्रेमदास यांनी अमरावतीकडे जाणाऱ्या चरण यांना लिफ्ट मागितली होती. वाहनावर बसल्यावर चरणने दुचाकी सुसाट वेगाने दामटली. भिवापूर धरणाच्या पुलावर त्याचे नियंत्रण सुटले. तो थेट नदीच्या कोरड्या पात्रात पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कुऱ्हा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जखमीला उपचारासाठी व मृताला शवविच्छेदानासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रक रणाची चौकशी कुऱ्हा पोलीस करीत आहे.

Web Title: One dies from bridge; One injured