वरुडमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली उलटून एकाचा मृत्यू, ११ मजूर गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2017 00:09 IST2017-01-22T00:09:26+5:302017-01-22T00:09:26+5:30
स्थानिक पंचायत समिती कार्यालयासमोर ट्रॅक्टरट्रॉली पलटी होऊन १ मजूर ठार तर, ११ गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी ११ वाजता घडली.

वरुडमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली उलटून एकाचा मृत्यू, ११ मजूर गंभीर
पंचायत समिती समोरील घटना : जखमींना अमरावती, नागपूरला हलविले
वरुड : स्थानिक पंचायत समिती कार्यालयासमोर ट्रॅक्टरट्रॉली पलटी होऊन १ मजूर ठार तर, ११ गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी ११ वाजता घडली. अतुल प्रकाश बहुरूपी (२६, रा. राजुरा बाजार) असे मृताचे नाव आहे.
संत्रामंडईतून निशान्यांसह मजुरांना घेऊन निघालेला ट्रॅक्टर क्र. एमएच-२-बीबी-१५८४ पुसल्याकडे निघाला होता. दरम्यान, रेस्टहाऊसजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक्टरची ट्रॉली पलटी झाली. यात बसलेले सर्वच मजूर फेकले गेले. स्थानिकांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच वरुडचे ठाणेदार गोरख दिवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अरुण नारायण ढोले, मंगला भलावी (दोघे रा.काटी), नरेंद्र पुंडलिकराव शेंदरे, धनराज रघुजी गोंडे (दोघे रा.राजूर बाजार), दिवाकर मोतीरामजी घाटोळे (रा. वाडेगाव), प्रकाश गायकवाड (रा.वाडेगाव), दिगांबर पांडुरंग माहुरे (रा.तळेगाव), चमेली नागवंशी (रा.वाडेगाव), मंदा कैलास उइके (रा.राजुरा बाजार), सचिन अभिमन्यू गोहाड (रा.राजुरा) बाजार हे गंभीर जखमी झाले. यातील काही जखमींना नागपूर व काही जखमींना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास वरुड पोलीस करीत आहे.