उच्चदाब वीजवाहिनीच्या संपर्कात येऊन एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:09 IST2021-07-12T04:09:50+5:302021-07-12T04:09:50+5:30

वनोजा बाग : अंजनगाव सुर्जीतील कोकाटखेल येथील रहिवासी सतीश ऊर्फ बाबू वा. भागवत (४५) हा उच्च दाब वीजवाहिनीला अडसर ...

One died after coming in contact with a high voltage power line | उच्चदाब वीजवाहिनीच्या संपर्कात येऊन एकाचा मृत्यू

उच्चदाब वीजवाहिनीच्या संपर्कात येऊन एकाचा मृत्यू

वनोजा बाग : अंजनगाव सुर्जीतील कोकाटखेल येथील रहिवासी सतीश ऊर्फ बाबू वा. भागवत (४५) हा उच्च दाब वीजवाहिनीला अडसर ठरत असलेल्या फांद्या तोडत असताना फांदीतल्या शनिवारी दुपारी १ वाजता मृत्यू झाला.

खोडगाव रोडवरील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील राऊत यांच्या शेताच्या धुऱ्यावरील गोंदणाच्या झाडाची फांदी तोडून देण्यास ओळखीच्या व्यक्तीने फोन करून सतीशला बोलावून घेतले होते. झाडावर चढल्यानंतर वाहिनीचा संपर्क झाल्याने त्याला विजेचा धक्का बसला. सचिन गावंडे, दीपक हंतोडकर, अमोल पटेल, रामेकर व युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत सतीशवर काळाने झडप घातली होती. खासगी व्यक्तीवर विजेच्या संपर्कात आलेली फांदी तोडण्याची वेळ कोणामुळे आली, याची चर्चा या घटनेच्या निमित्ताने शहरात उठली होती.

Web Title: One died after coming in contact with a high voltage power line