ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 22:35 IST2018-04-27T22:35:52+5:302018-04-27T22:35:52+5:30

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शनच्या मागणीसाठी जागतिक कामगार दिन, १ मे रोजी मोर्शी तालु्क्यातील ग्रामपंचायत कर्मचारी हे गटविकास अधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन करतील.

One-day Demolition movement of Gram Panchayat employees | ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय धरणे आंदोलन

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय धरणे आंदोलन

ठळक मुद्दे१ मेची मुदत : गटविकास अधिकाºयांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शनच्या मागणीसाठी जागतिक कामगार दिन, १ मे रोजी मोर्शी तालु्क्यातील ग्रामपंचायत कर्मचारी हे गटविकास अधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन करतील.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत नुकतेच निवेदन दिले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शन नियमित मिळावी म्हणून राज्य शासनाने २ आॅगस्ट २०१७ रोजी समिती गठित केली. या समितीला तीन महिने मुदत असताना, दीड वर्ष होऊनही आपला अहवाल सादर केला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शन मिळण्यास विलंब होत आहे. परिणामी संघटनेच्यावतीने कामगार दिनी एक दिवसीय धरणे आंदोलन पंचायत समिती कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील ग्रा. पं. कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन संघटना अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी अमरावती, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी, मोर्शी पोलीस ठाणे व तहसीलदारांना दिल्या आहेत.

Web Title: One-day Demolition movement of Gram Panchayat employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.