शिक्षक महासंघाद्वारे एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:14 IST2018-06-06T22:14:45+5:302018-06-06T22:14:55+5:30

वाशिम जिल्ह्यातील १३९ तसेच अकोला, यवतमाळ, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या पदमान्यता अवैध ठरविल्याच्या आयुक्त यांच्या आदेशाचा विरोध व २०१२ नंतर वैयक्तिक मान्यता रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षक महासंघाद्वारा ८ जून रोजी शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.

One-Day Anniversary Movement by Teachers Federation | शिक्षक महासंघाद्वारे एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन

शिक्षक महासंघाद्वारे एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन

ठळक मुद्देशेखर भोयर : शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना सेवासंरक्षण मिळालेच पाहिजे

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वाशिम जिल्ह्यातील १३९ तसेच अकोला, यवतमाळ, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या पदमान्यता अवैध ठरविल्याच्या आयुक्त यांच्या आदेशाचा विरोध व २०१२ नंतर वैयक्तिक मान्यता रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षक महासंघाद्वारा ८ जून रोजी शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये शिक्षक व कर्मचाºयांचा काहीही दोष नसताना त्यांना विनाकारण अडकविले जात आहे. हा आदेश रद्द करून त्यांना सेवा संरक्षण देण्यात यावे व त्यांच्या वैयक्तिक मान्यता नियमित करण्यात याव्यात, यासाठी हे एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केल्या जाणार आहे.
या आंदोलनात पदमान्यता अवैध ठरविलेल्या तसेच सन २०१२ नंतर सेवासमाप्ती करण्यात आलेल्या अमरावती विभागातील शिक्षक व कर्मचाºयांंनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केले आहे. याच आठवड्यात विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट घेऊन चर्च्चा करण्यात आली. हा प्रश्न येत्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात लावून धरण्याची विनंती शेखर भोयर यांनी केली हे सर्व कर्मचारी निर्दोष असून त्यांना शिक्षणाधिकारी यांनी रीतसर नियुक्तीचे पत्र दिले आहे. शिक्षणाधिकारी हे प्रशासनाचेच प्रतिनिधी असून त्यांना यासाठी जबाबदार न धरता यामध्ये केवळ शिक्षक व कर्मचाºयांंचा नाहक बळी जात आहे. बरीच वर्षे सेवा झाल्यानंतर त्याची वैधता आता तपासणे हे विसंगत आहे.

Web Title: One-Day Anniversary Movement by Teachers Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.