आदिवासींच्या उत्थानाचा एक कोटींचा निधी परत
By Admin | Updated: January 10, 2016 00:09 IST2016-01-10T00:09:33+5:302016-01-10T00:09:33+5:30
आदिवासी भागाच्या विकासासाठी असलेला एक कोटी रुपयांचा निधी प्रकल्प अधिकारी रमेश मवाशी यांनी ...

आदिवासींच्या उत्थानाचा एक कोटींचा निधी परत
प्रकल्प अधिकाऱ्याचा प्रताप : अनिल बोंडेंचा एटीसीत ठिय्या
अमरावती : आदिवासी भागाच्या विकासासाठी असलेला एक कोटी रुपयांचा निधी प्रकल्प अधिकारी रमेश मवाशी यांनी विकासकामावर खर्च न करता शासनाकडे परत पाठविल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. निधी खर्च करण्यात अपयशी ठरलेल्या आणि वरिष्ठांना विश्वासात न घेता तो विकासनिधी परस्पर शासनदरबारी जमा करणाऱ्या मवाशी यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी आमदार अनिल बोंडे यांनी शनिवारी येथील अप्पर आदिवासी कार्यालयामध्ये ठिय्या दिला.
शनिवारी आ. बोंडे ठक्करबाप्पा योजनेसंदर्भातील निधीची माहिती घेण्याकरिता अप्पर आयुक्त आदिवासी विकास कार्यालयात गेले असता त्यांच्यासमोर हा प्रकार उघड झाला. त्यामुळे बोंडे यांनी उपायुक्त नितीन तायडे यांच्या कक्षात ठिय्या दिला.
आदिवासी भागातील विकास कामासाठी शासनाकडून निधी देण्यात येतो. या निधीच्या खर्चाबाबत माहिती जाणून घेण्याकरिता आ. बोंडे आदिवासी विकास विभागात गेले होते. तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर जवळपास एक कोटींचा निधी परत गेल्याचे त्यांना समजले.