शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
2
दगडफेक अन् खुर्चीफेक, अखिलेश यादवांच्या सभेत उडाला गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, काय घडलं?
3
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
4
तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले
5
सावधान! आरोग्यविषयक ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी चहाचा एक घोट ठरू शकतो ‘विष’
6
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
7
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
8
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
9
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
10
Fact Check : भाजपने भारतीय मेट्रोचा विकास म्हणत शेअर केला सिंगापूरचा फोटो
11
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
13
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
14
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
15
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
16
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
17
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
18
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
19
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
20
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल

दर मिनिटाला एक कोरोना पाॅझिटिव्ह दोन तासांत एका संक्रमिताचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 5:00 AM

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग अचानक वाढल्यानंतर चार प्रकारांतील प्रत्येकी २५ असे एकूण नमुने जिनोम स्टडीकरिता पाठविण्यात आले होते. त्यात ७६ नमुन्यांमध्ये ‘डबल व्हेरिएंट म्युटंट’ आढळला होता. याची संसर्ग क्षमता अधिक असल्याने जिल्ह्यात ब्लास्ट झाल्याचे आरोग्य यंत्रणेद्वारा सांगण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू करण्यात आली.

ठळक मुद्देएप्रिलमध्ये जिल्हास्थिती गंभीर, १६,६९४ कोरोनाग्रस्त अन् ४१० मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट झाला. या ३० दिवसांत उच्चांकी १६,६९४ कोरोनाग्रस्तांची नोंद व दर १.४१ मिनिटाला एक पॉझिटिव्ह निष्पन्न झालेला आहे. याशिवाय या महिनाभरात ४१० रुग्णांचे उपचारादरम्यान मृत्यू म्हणजेच दर दोन तासांत एका बाधिताचा मृत्यू झाल्याने ही बाब जिल्ह्यावासीयांचे हृहयाचे ठोके वाढविणारी आहे.जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा उद्रेक वाढायला सुरुवात झाली. यात फेब्रुवारी महिन्यात १३,२२० व ९२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मार्च महिन्यात १३,५१८ पॉझिटिव्ह व १६४ रुग्णांचे मृत्यू झाले. त्यानंतर एप्रिल महिन्यात कहरच झाला. तब्बल १६,६९४ कोरोनाग्रस्त व ४१० बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याला हादरा बसला आहे. या महिन्यात दरदिवशी सरासरी ५५७ कोरोनाग्रस्त व १४ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय या महिन्यात १२,२१३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. म्हणजेच दरदिवशी ४०७ व्यक्ती संकेमणमुक्त झाले, हा या चिंतेच्या काळातही दिलासा राहिला आहे.जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग अचानक वाढल्यानंतर चार प्रकारांतील प्रत्येकी २५ असे एकूण नमुने जिनोम स्टडीकरिता पाठविण्यात आले होते. त्यात ७६ नमुन्यांमध्ये ‘डबल व्हेरिएंट म्युटंट’ आढळला होता. याची संसर्ग क्षमता अधिक असल्याने जिल्ह्यात ब्लास्ट झाल्याचे आरोग्य यंत्रणेद्वारा सांगण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू करण्यात आली. हे एक प्रकारचे मिनी लॉकडाऊन राज्यात पहिल्यांदा अमरावती जिल्ह्यात लागू झाले असतानाही कोरोनाचा संसर्ग वाढताच राहिला. आता तर पुन्हा महिनाभरासाठी संचारबंदी  व जीवनावश्यक शिवाय सर्व दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आलेली असतानाही संसर्ग कमी होत नसल्याने चिंता वाढली आहे.

ॲक्टिव्ह ८,२३३ रुग्णांचा उच्चांक जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढती असल्याने सद्यस्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या उच्चांकी ८,२३३ वरे पोहोचली आहे. यामध्ये  १९१५ रुग्ण विविध रुग्णालयात दाखल आहेत. याशिवाय महापालिका क्षेत्रात १,३४३ व जिल्हा ग्रामीणमध्ये ४,९७५ कोरोनाग्रस्त होम आयसोलेशनची सुविधा घेत आहेत. त्यामुळे तूर्तास आरोग्य यंत्रणेवरचा ताण काहीसा कमी झालेला आहे. मात्र, ग्रामीण भागात संसर्ग वाढता असल्याने या रुग्णांवर करडी नजर ठेवणे महत्त्वाचे आहे.

नागपूरसह अन्य जिल्हे व एमपीतील रुग्ण जिल्ह्यात दाखलजिल्हा सीमेलगतच्या नागपूर, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात व मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला असल्याने आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू बेड अपुरे पडत आहे. याशिवाय रेमेडेसिविरचा तुटवडा आहे. त्यामुळे गंभीर स्वरुपातील तिनशेवर रुग्ण, अमरावतीसह, अचलपूर, वरूड व तिवसा तेथील शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांचे नातेवाईक येथे दाखल झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट झाल्याचे मानण्यात येत आहे.

जिल्ह्यात बेडसंख्येचा तुटवडाअन्य जिल्हे व मध्यप्रदेशातील रुग्ण दाखल असल्याने जिल्ह्यातील सर्वच शासकीय व खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन बेड, आयसीयू व व्हेंटिलेटरचा तुडवटा आहे. रुग्णाला आणणाऱ्या १०८ रुग्णवाहिका बेड रिक्त आहे का, याची चौकशी करीत शहरातील २९ रुग्णालयांत चकरा मारत असल्याचे विदारक चित्र आहे. संकेतस्थळावर माहितीदेखील नियमित अपडेट केली जात नाही.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू