गर्दी टाळण्यासाठी ओंकारेश्वर दर्शन, नर्मदा स्नानाला प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:11 IST2021-04-12T04:11:51+5:302021-04-12T04:11:51+5:30
अमरावती : चैत्र अमावस्या व पाडव्यानिमित्त अनेक भाविक दर्शनासाठी ओंकारेश्वरला जातात. तथापि, यंदा महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अनेक जिल्ह्यांत कोरोनाची ...

गर्दी टाळण्यासाठी ओंकारेश्वर दर्शन, नर्मदा स्नानाला प्रतिबंध
अमरावती : चैत्र अमावस्या व पाडव्यानिमित्त अनेक भाविक दर्शनासाठी ओंकारेश्वरला जातात. तथापि, यंदा महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अनेक जिल्ह्यांत कोरोनाची साथ असल्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकांना मनाई असल्याचे पूर्व निमाड-खांडवा जिल्हाधिकारी अनय द्विवेदी यांनी जिल्हा प्रशासनाला कळविले आहे.
द्विवेदी यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना लिहिलेल्या पत्रात नमूद आहे की, १२ एप्रिलची चैत्र अमावस्या व १३ एप्रिलच्या गुढीपाडव्यानिमित्त अनेक भाविक ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन व नर्मदा स्नानासाठी, तसेच खांडवा जिल्ह्यातील पुनासा तालुक्यातील संत सिंगाजी समाधीस्थळाच्या दर्शनासाठी येत असतात. तथापि, आता दोन्ही राज्यांत कोरोनाची साथ आहे. गर्दी टाळण्यासाठी ओंकारेश्वर मंदिर, तेथील नर्मदेचा तट, तसेच संत सिंगाजी समाधीस्थळ येथे प्रवेशाबाबत निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
कोरोना साथ लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील नागरिकांनी पाडवा घरीच राहून साजरा करावा व साथ नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल नवाल यांनी केले आहे.