शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पाठयपुस्तकेही आता दप्तरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:15 IST

अमरावती : शैक्षणिक वर्ष सुरू झाले की, नवी कोरी पुस्तके विद्यार्थ्यांच्या दप्तरात दिसतात आणि वर्ष संपले की, तीच पुस्तके ...

अमरावती : शैक्षणिक वर्ष सुरू झाले की, नवी कोरी पुस्तके विद्यार्थ्यांच्या दप्तरात दिसतात आणि वर्ष संपले की, तीच पुस्तके रद्दीत गेल्याचे दिसून येते. मात्र, हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने आता पुस्तक पुनर्वापर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे जिल्ह्यात विद्यार्थ्यांना वितरित झालेली लाखो पुस्तके वापरात येणार असल्याने यात लाखो रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे.

सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी झाल्यानंतर २००९ पासून राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी संस्थांच्या पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पाठपुस्तके वाटप केली जातात. विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण हा त्यामागील उद्देश आहे. या योजनेत लाखाेंच्या संख्येने पुस्तकांचे वाटप केले जाते. यापोटी लाखो रुपयांचा खर्च दरवर्षी केला जातो. विशेष म्हणजे, एका पाठ्यपुस्तकाचा संच विद्यार्थ्यांनी चांगला वापरल्यास दोन ते तीन वर्षे सहज उपयोगात आणला जाऊ शकतो. मात्र, पुनर्वापरावर भर न दिल्याने दरवर्षी नवी पुस्तके वाटपाची योजना सुरू आहे.

बॉक्स

पुनर्वापराचा निर्णय

शिक्षण विभागाने पर्यावरणाचे संवर्धन आणि कागदाची बचत करण्यासाठी एकदा वापरलेल्या पाठपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जतनासाठी वापर कमी करणे आणि पुनर्वापर करणे ही संकल्पनाही या माध्यमातून रुजविली जावी, हा यामागील उद्देश आहे.

बॉक्स

प्रायोगिक तत्त्वावर निर्णय

यापुढे आता विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पाठपुस्तकांपैकी ज्यांची पुस्तके योग्यरीतीने जपणूक करून सुस्थितीत ठेवलेली आहे, अशी पुस्तके संकलित करून पुढील वर्षी विद्यार्थ्यांना वाटावीत, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जून २०२१ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडे याची जबाबदारी दिलेली आहे. यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर या उपक्रमातून किती पाठपुस्तके जमा होतील तसेच विद्यार्थी किंवा पालकांचा किती प्रतिसाद मिळतो, यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

कोट

यासंदर्भात शासन पातळीवरून पत्र मिळाले आहे. सदर पत्रातील सूचनेप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल.

- ई.झेड.खान,