रतनगंज परिसरात खाद्यतेलाच्या जुन्या पिंपांचा बाजार
By Admin | Updated: January 10, 2017 00:12 IST2017-01-10T00:12:12+5:302017-01-10T00:12:12+5:30
रतनगंज परिसरात खाद्यतेलाच्या जुन्या पिंपांचा बाजार भरतो. येथे ते डब्बे धुतली जातात. त्यानंतर जंग लागलेली पिंपे पुन्हा बाजारपेठेत विक्री केले जात आहे.

रतनगंज परिसरात खाद्यतेलाच्या जुन्या पिंपांचा बाजार
अन्न प्रशासन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष : खाद्यतेलाच्या विक्रीसाठी वापर
संदीप मानकर अमरावती
रतनगंज परिसरात खाद्यतेलाच्या जुन्या पिंपांचा बाजार भरतो. येथे ते डब्बे धुतली जातात. त्यानंतर जंग लागलेली पिंपे पुन्हा बाजारपेठेत विक्री केले जात आहे. पुन्हा हे डब्बे रियुज करुन याममध्ये नागरिकांना खाद्यतेल विक्रीचा खुलेआम गौरखधंदा चालतो. परंतु अशा जुन्या पिंपाच्या वापरावर अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार गुन्हा असून अशा डब्बयांचा सर्रास वापर करून नागरिकांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे.
'लोकमत'ने यासंदर्भात रविवारी स्टिंग केले असता हा गौरखधंदा 'लोकमत'च्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. इतवारा बाजारातील अॅकॅडमिक स्कूलच्या बाजूला रतनगंज परिसरातील काला नागोबा परिसरात हा बाजार भरतो. या बाजारात अनेक व्यवसायिक असतात.
शहरातील किराणा दुकानदारांकडून ७ ते ८ रुपयाला हे खाद्यतेलाचे जुने पिंपे विकत घेण्यात येतात. यानंतर हे काला नागोबा परिसरातील अनेक ठिकाणी धुतले जातात. यानंतर त्याच दुकानदारांना हे पिंपे २० ते ३० रुपयांपर्यंत विक्री करण्यात येते. यानंतर दुकानदार ड्रममध्ये आलेले खाद्यतेल या जंग लागलेल्या व जुन्या पिंप्यांमध्ये भरून नागरिकांना खुल्या तेलाची विक्री करण्यात येते. जुन्या पिंप्यांचा वापर करणे हे नियमबाह्य असून अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अशा किराणा व्यापाऱ्यांवर धाडी टाकून या जुन्या पिंप्यांची तपासणी केली, तर जे काय आहे ते सत्य बाहेर निघेल.
या धंद्यात अनेक दिवसांपासून सुरु असून याकडे पोलीसांचे व अन्न व प्रशासन विभागाचे दुर्लक्ष आहे. जंग लागलेले व इंनफेक्शन या डब्यांचा पूर्णवापर करण्यात येत असल्याने या पासून नागरिकांना विविध आजार होत आहे. यामुळे पोटाचे आजार व कर्करोग होण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञ डॉक्टरांनी वर्तविला आहे. परंतु नागरिकांच्या जिविताशी रोज खाद्यतेल विक्रेते खेळ करी आहेत. पण अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी गप्प का, असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे.
नालीत धुतले जातात खाद्यतेलाचे पिंप
अनेक ठिकाणी खाद्यतेलाच्या पिंपांचे विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे येथे शेकडो पिप्यांचे ढिग , लागलेले निदर्शनास आले आहे. हे पिंपे ज्या ठिकाणी धुण्यात येतात त्या ठिकाणी मोठी नाली आहे. त्या नालीवर डिटरजंट सदर डब्बे धुतल्या जात आहे. त्यामुळे हे घाणे पाणी सुध्दा या डब्यात चिकटते. व त्याच किरकोळ व्यापारी खुले खाद्यतेल भरून ते नागरिकांना विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे खुले पिंप विक्रीचा व्यापार थांबविणे गरजेचे झाले आहे. जुन्या पिंपांमध्येच जर खाद्यतेल भरून विक्री करण्यात येत असेल तर अन्न व प्रशासन विभागाने धाडी टाकून कारवाई करणे अपेक्षित आहे.
एफडीए गप्प का?
शहरात गंज लागलेल्या जून्या पिप्यांमधुन खुल्या खाद्यतेलाची विक्री होत आहे. हे नियमबाह्य असून यामुळे हे तेल नागरिकांच्या खाण्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या जिविताला धोका निर्माण होण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. हा प्रकार लोकमतने शुक्रवारच्या अंकात लोकदरबारात मांडले. लोकांचे आरोग्य धोक्यात असताना अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी गप्प का, असा सवाल जागरूक नागरिक विचारत आहेत.
जुन्या पिंपांचा वापर केल्याने त्यात जर विशिष्ट प्रकारचे केमिकल राहते. ते खाद्यतेलात मिश्रित झाले तर नागरिकांना विषबाधा होऊ शकते. तसेच संसर्ग झाल्याने व हे अनेकवेळा खाण्यात आल्याने मेंदू, यकृत, हृदयाचे आजार वाढण्याची शक्यता अधिक असते.
- अतूल यादगिरे, कॅन्सर तज्ज्ञ, अमरावती