रेल्वेखाली कटून वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:12 IST2021-04-05T04:12:03+5:302021-04-05T04:12:03+5:30
अमरावती : रेल्वेखाली कटून ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना राजापेठ हद्दीतील रेल्वे लाईनवर शनिवारी सायंकाळी घडली. दामोदर नानकराम ...

रेल्वेखाली कटून वृद्धाचा मृत्यू
अमरावती : रेल्वेखाली कटून ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना राजापेठ हद्दीतील रेल्वे लाईनवर शनिवारी सायंकाळी घडली. दामोदर नानकराम शर्मा (८० रा. श्रीकृष्ण विहार, सातुर्णाजवळ) असे मृताचे नाव आहे. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामाअंती आकस्मिक मृत्यूची नोंद केली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात पाठविला.
000000000000000000000000
मद्यपी इसमाचा आकस्मिक मृत्यू
अमरावती : मद्याच्या व्यसनामुळे एका ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी नांदगाव पेठ हद्दीत उघडकीस आली. अंकुश बाळासाहेब वानखडे (३५ रा. बोरगाव धर्माळे) असे मृताचे नाव आहे. होळी सणापासून अंकुशची प्रकृती बिघडली होती. त्याला शनिवारी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
00000000000000000000000000
रेस्ट हाऊससमोर अवैध दारू विक्रेत्याला अटक
अमरावती : बडनेरा पोलिसांनी शनिवारी अवैध दारूची वाहतुक करणार्या एका दारु विक्रेत्याला रेस्ट हाऊसमोरील रोडवरून अटक केली. आशिष राजकुमार बागडे (२८ रा. सदगुरुनगर) असे आरोपीचे नाव आहे. बडनेरा ठाण्याचे पोलीस पेट्रोलिंग करीत असताना, त्यांनी आशिष बागडेजवळील कापडी थैलीची पाहणी केली. त्यात देशी दारूच्या २३ बॉटल आढळून आल्या. पोलिसांनी आशिषला ताब्यात घेऊन त्याच्याविरुध्द गुन्हा नोंदविला.