थोरल्याने धाकट्याला संपविले
By Admin | Updated: June 26, 2016 00:05 IST2016-06-26T00:05:12+5:302016-06-26T00:05:12+5:30
घर विकण्याच्या वादातून थोरल्याने धाकट्या भावाची पहाटे ३ वाजता झोपेत गळा आवळून हत्या केली.

थोरल्याने धाकट्याला संपविले
परतवाड्यातील घटना : घर विक्रीचा वाद जीवावर
परतवाडा : घर विकण्याच्या वादातून थोरल्याने धाकट्या भावाची पहाटे ३ वाजता झोपेत गळा आवळून हत्या केली. ही घटना शिरभाते नगरात शुक्रवारी घडली. वडिलांच्या फिर्यादीवरुन परतवाडा पोलिसांनी आरोपी भावास अटक केली आहे.
मनीष संतोष नागवे (२२, रा. शिरभातेनगर) असे मृतक तरुणाचे नाव आहे.
आरोपीकडून हत्येची कबुली
परतवाडा : प्रितेश संतोष नागवे असे लहान भावाचा गळा आवळून हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. घर विकण्याच्या वादातून दोन्ही भावामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. या संदर्भात वडील संतोष नागवे यांनी दोन्ही भावांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. शुक्रवारी हा वाद रात्री पुन्हा उफाळून आला. सर्व झोपले असता पहाटे ३ वाजता आरोपी प्रितेश याने बाजूला झोपलेला लहान भाऊ मनिषचा गळा आवळून हत्या केल्याची कबूली परतवाडा पोलिसांना दिली. सकाळी सर्वजण उठल्यावर मनिषने आत्महत्या केल्याचा बनाव आरोपीने केला. पोलिसांनी संशयावरून प्रितेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले. शुक्रवारी चौकशीदरम्यान आपणच भावाची हत्या केल्याची कबूली त्याने दिली. वडील संतोष वागणे यांनी तक्रार नोंदविली.