जुना धामणगाव, दाभाडा ते कावली रस्ता खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:13 IST2020-12-22T04:13:24+5:302020-12-22T04:13:24+5:30

कावली वसाड : जुना धामणगाव ते कावली या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. परिणामी, वाहनचालक व पादचाऱ्यांना कमालीचा त्रास सहन ...

Old Dhamangaon, Dabhada to Kavali road is paved | जुना धामणगाव, दाभाडा ते कावली रस्ता खड्डेमय

जुना धामणगाव, दाभाडा ते कावली रस्ता खड्डेमय

कावली वसाड : जुना धामणगाव ते कावली या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. परिणामी, वाहनचालक व पादचाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गतवर्षी या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. परंतु, कोरोनाकाळात काम बंद पडले. तेव्हापासून या रस्त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. गिट्टी मोठ्या प्रमाणात उघडी पडली आहे.

एकीकडे जुना धामणगाव ते अंजनसिंगी रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक जुना धामणगाव, दाभाडा, कावली या मार्गाने वळविण्यात आली आहे. सततच्या वाहतुकीमुळे धुळीने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या रस्त्याने चिंचपूर, शिदोडी, वसाड, कावली, दाभाडा, पिंपळखुटा या गावांचे नागरिक रात्री उशिरापर्यंत प्रवास करतात. विद्यार्थीदेखील याच मार्गाने धामणगावला शिक्षण घेण्यासाठी ये-जा करतात. प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे नागरिक त्रस्त आहेत.

Web Title: Old Dhamangaon, Dabhada to Kavali road is paved