शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

अरे सागरा, भीम माझा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:58 AM

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६२ व्या महापरिनिर्वाण दिनी गुरुवारी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था व नागरिकांनी आदरांजली अर्पण केली.

ठळक मुद्देमहामानवाला आदरांजली : इर्विन चौकात गर्दी; बाबासाहेबांपुढे अनुयायी नतमस्तक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६२ व्या महापरिनिर्वाण दिनी गुरुवारी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था व नागरिकांनी आदरांजली अर्पण केली. इर्र्विन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर गर्दीने फुलला होता. ‘अरे सागरा भीम माझा येथे निजला, शांत हो जरा...’ असे म्हणत शोषित, पीडित जनांनी आपल्या मुक्तिदात्याला नमन केले.शहरातील इर्विन चौक, भीमटेकडी, शेगाव, बडनेरा नवीवस्ती, अशोकनगर, समता चौकातील पुतळा परिसरात सकाळी ६ पासूनच आदरांजली अर्पण करण्यासाठी अनुयायांनी एकच गर्दी केली होती. आक्रमण संघटनेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी भंते काश्यप बोधी, भंते कौंडण्य बोधी, भंते प्रज्ञा बोधी, भंते राहुल बोधी व भिक्षुणी धम्मचारिणी आदींच्या भिक्षू संघाने सामूहिक बुद्धवंदना अनुयायांना दिली. यादरम्यान बिगूल वाजवून तमाम शोषितांच्या मुक्तिदात्याला मानवंदना देण्यात आली. रवि गवई यांच्या पुढाकाराने आक्रमण संघटनेने आदरांजली कार्यक्रम आयोजित केला होता. इर्विन चौकात भीम-बुद्धगीतांच्या कार्यक्रमाची मेजवानी अनुयायांना घेता आली. बडनेरा येथे दी बुद्धिस्ट स्टडीजच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ‘एक पेन-एक वही’ हा उपक्रम राबविण्यात आला.तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, संत कबीर आदी समाजप्रबोधनकारांच्या विचारांचे ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होते. पंचशील, निळे झेंडे, गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या विक्रीचे स्टॉलदेखील मोठ्या प्रमाणात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे छायाचित्र अंकित असलेली माळ, लॉकेट, साखळी, हँडबेल्ट, मूर्ती आदी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन, विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयातर्फे आरोग्य तपासणी व मोफत औषधवाटप, सिकलसेल जनजागृती स्टॉल, महापालिकातर्फे स्वच्छ अ‍ॅप डाऊनलोड मार्गदर्शन स्टॉल, जिल्हा माहिती कार्यालयाचे ‘लोकराज्य’ पुस्तक विक्री स्टॉल लक्षवेधी ठरले.इर्विन चौकात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्थांच्यावतीने आदरांजली अर्पण करणारे होर्डिंग्ज झळकत होते. विविध गं्रथप्रदर्शन, खेळणी, हार-फुलांची दुकाने आणि अभिवादनासाठी शुभ्र वस्त्र परिधान करून आलेल्या अनुयायांच्या भरगच्च गर्दीने इर्विन चौकाला यात्रेचे स्वरूप आले होते. गुरुवारी सूर्य उगवण्यापूर्वीच आदरांजली वाहण्यासाठी लागलेली रांग रात्री उशिरापर्यंत कायम होती.ग्रंथाचे स्टॉल लक्ष वेधणारे ठरलेइर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दिवसभर प्रचंड गर्दी होती. विविध महापुरूष, विचारवंतांचे ग्रंथ विक्रीचे स्टॉल लक्ष वेधत होते. यंदा ग्रंथाच्या स्टॉलवरून मोठ्या प्रमाणात साहित्य विक्री झाली. अनेक भीम अनुयायांनी ग्रंथ खरेदीला प्राधान्य दिल्याचे चित्र अनुभवता आले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर