कार्यालये, शाळा क्लिन
By Admin | Updated: October 3, 2014 01:03 IST2014-10-03T01:03:56+5:302014-10-03T01:03:56+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशव्यापी स्वच्छ भारत अभियान मोहिमेला गुरूवारी शहर व जिल्ह्यात धडाक्यात सुरूवात करण्यात आली.

कार्यालये, शाळा क्लिन
अमरावती : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशव्यापी स्वच्छ भारत अभियान मोहिमेला गुरूवारी शहर व जिल्ह्यात धडाक्यात सुरूवात करण्यात आली. वरिष्ठ अधिकारी ते शाळकरी विद्यार्थ्यांनी स्वयंमस्फूर्तीने सहभाग नोंदविला. स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनाच कळावे यासाठी हा संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्यात आला.
‘क्लिन इंडिया २०१९’ या मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला २ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. त्यानंतर समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. जगदीश सायसिकमल यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर सकाळी ८ वाजतापासून जिल्हा परिषदेत सर्व विभागाचे खातेप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन आपली कार्यालये स्वच्छ केली. जिल्हा परिषद बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पी. जी. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता व कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील धूळ कचरा हाताने स्वच्छ करीत कार्यालय व परिसर स्वच्छ केला. याशिवाय सर्व विभागांतही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी के. एम. अहमद, जे. एन. आभाळे, सिंचनचे यू. जे. क्षीरसागर, भालेराव, भाऊराव चव्हाण, चंद्रशेखर खंडारे, कैलास घोडके, सोळंके, संदीप देशमुख, येवले यांच्यासह पकंज गुल्हाने, मंगेश मानकर, श्रीकांत मेश्राम, विजय कविटकर, प्रदीप बद्रे, प्रशांत सातव, दर्शना गौतम, सोपान लांडगे, गंधे, संजय राठी, गजानन कोरडे, संजय गिरी, सुहास चौधरी, नाल्हे, राठोड तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले होते.
आदिवासी विकास विभागातही स्वच्छता अभियान उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी सहायक आयुक्त किशोर गुल्हाने यांच्याहस्ते महात्मा गांधी यांचे फोटोचे पूजन करून थोर पुरूषांना अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांना शपथ दिली.