अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थिती घडविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:20 IST2021-02-23T04:20:24+5:302021-02-23T04:20:24+5:30
अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यामध्ये २२ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजतापासून ते १ मार्चपर्यंत जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू ...

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थिती घडविली
अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यामध्ये २२ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजतापासून ते १ मार्चपर्यंत जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे. या प्रार्श्वभूमीवर झेडपीतील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती घटविली आहे. यामध्ये १५ टक्के किंवा कमीत कमी १५ कर्मचारी उपस्थिती निश्चित केली आहे. याबाबत याबाबत सीईओ अमोल येडगे यांचे आदेशान्वये सामान्य प्रशासनचे प्रभारी डेप्युटी प्रशांत थोरात यांनी जारी केले आहेत.
दिवसेदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहेत. यामुळे जिल्हाभरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या प्रार्श्वभूमीवर झेडपी प्रशासनाने कोरोनाचा प्रसार कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग वगळता इतर विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती १५ टक्के किंवा १५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून उपस्थित निश्चित केलेली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग वगळता अन्य विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनी दैनंदिन कार्यालयात असलेली उपस्थिती १० टक्के राहणार नसून ती केवळ २८ मार्चपर्यंत १५ टक्केच राहणार आहे.