अधिकाऱ्यांची मंत्र्यालयात पेशी

By Admin | Updated: August 26, 2015 00:13 IST2015-08-26T00:13:16+5:302015-08-26T00:13:16+5:30

महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने १ ते ४ जुलै २०१४ मध्ये अमरावती जिल्हा परिषदेला भेट दिली होती.

Officers in the ministry of the ministry | अधिकाऱ्यांची मंत्र्यालयात पेशी

अधिकाऱ्यांची मंत्र्यालयात पेशी

जिल्हा परिषद : अनुसूचित जमाती कल्याण समिती भेट
अमरावती : महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने १ ते ४ जुलै २०१४ मध्ये अमरावती जिल्हा परिषदेला भेट दिली होती. त्यासंदर्भात सचिवांसमोर मंत्रालयातील पहिल्या माळ्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्वच १४ विभागांच्या खातेप्रमुखांची साक्ष बुधवारी २६ आॅगस्ट रोजी नोंदविली जाणार आहे. यासाठी मिनीमंत्रालयातील सर्व विभागप्रमुख मंगळवारीच मुंबईला रवाना झाले आहेत.
विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने मागील वर्षी जुर्लै महिन्यात भेट दिली होती. यावेळी घेण्यात आलेल्या विविध विभागांच्या आढाव्यात जिल्हा परिषदेच्या सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, व अनुशेष व त्याच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांबाबत सर्वसंबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांची साक्ष घेतली होती. दरम्यान उपस्थित झालेल्या काही मुद्यांवर अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार केलेल्या कार्यवाहीबाबत अनुुसूचित जमाती कल्याण समितीने यावर बुधवार २६ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता मंत्रालयात विभागीय सचिव यांच्या समक्ष साक्ष घेतली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनील निकम, कै लास घोडके, आदींसह, समाजकल्याण, आरोग्य, कृषी, बांधकाम, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, पंचायत विभाग, सिंचन, वित्त, शिक्षण विभागाच्या खातेप्रमुखांना विस्तृत माहितीसह उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी मंगळवारी सायंकाळी मुंबईला रवाना झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Officers in the ministry of the ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.