चोरीच्या विजेने झळाळले कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST2019-12-25T05:00:00+5:302019-12-25T05:00:27+5:30

सर्वसामान्य ग्राहकांकडे देयक थकीत राहिल्यास महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र, या कार्यालयात दिवसाढवळ्या मुख्य तारांवर आकोडे टाकून वीजचोरी केली जात असताना, ती कुणालाही दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Office stolen with stolen electricity | चोरीच्या विजेने झळाळले कार्यालय

चोरीच्या विजेने झळाळले कार्यालय

ठळक मुद्देधूळघाट वन्यजीव परिक्षेत्र : वीजचोरी; बिनधास्त टाकले आकोडे, महावितरण कारवाई करणार का?

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : मेळघाट वन्यजीव-२ अंतर्गत १ फेब्रुवारीपासून धूळघाट वनपरिक्षेत्र नव्याने अस्तित्वात आले. मात्र तूर्तास या कार्यालयाकडे वनविभागाने दुर्लक्ष चालविले आहे. त्यात कळस म्हणजे, कार्यालय व शासकीय निवासस्थानाकरिता आकोडे टाकून वीजचोरी केली जात आहे.
सर्वसामान्य ग्राहकांकडे देयक थकीत राहिल्यास महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र, या कार्यालयात दिवसाढवळ्या मुख्य तारांवर आकोडे टाकून वीजचोरी केली जात असताना, ती कुणालाही दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पूर्वी धूळघाट रेल्वे वनपरिक्षेत्र हे पश्चिम मेळघाट अंतर्गत प्रादेशिक वनवृत्तात समाविष्ट होते. व्याघ्र प्रकल्पाचे विस्तारीकरणादरम्यान या वनपरिक्षेत्राचे रूपांतरण वन्यजीवमध्ये झाले. सोमवारी या वन्यजीव परिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी बेपत्ता आढळून आले. आर.पी. काटे नामक वनमजुराकडे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसंदर्भात विचारणा केली असता, ते रजेवर असल्याचे सांगण्यात आले. वर्तुळ अधिकारी जंगल पाहणी करण्यासाठी गेल्याचे सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी वाय. व्ही. तापस यांचा भ्रमणध्वनी क्रमांक त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता. येथे वनपरिक्षेत्र अधिकारी निवास आहे. या निवासात व वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला तारेवर आकोडे लावून वीजपुरवठा घेतल्याचे दिसून आले. याबाबत काटे यांना विचारले असता, मीटरमधून नव्हे, आकोडे लावून वीजपुरवठा घेतल्यास संगणक सुरू होतो, असे त्यांनी सांगितले. दरम्यान तापस यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

अधिकारी गैरहजर
वन्यजीव परिक्षेत्रात एक वनपरिक्षेत्र अधिकारी व बिरोटी, मोगर्दा, गोलाई आणि धूळघाट रेल्वे बीटमध्ये चार वनपाल, एक क्लर्क आणि १३ वनरक्षक कार्यरत असल्याची माहिती वनमजूर काटे यांनी दिली. शासकीय कामकाजाच्या पहिल्या दिवशी एका वनमजुराव्यतिरिक्त एकही जण आढळून आला नाही.

कार्यालयातील विजेवर संगणक चालत नाहीत. त्यामुळे आकोडे टाकून त्यासाठी विजपुरवठा घेतला जातो. तो वैध की अवैध त्याबाबत माहिती नाही. वनपरिक्षेत्र अधिकारीच त्याबाबत बोलू शकतील. वर्तुळ अधिकारी जंगल पाहणीसाठी गेले आहेत.
- आर.पी.काटे, वनमजुर धूळघाट वन्यजीव परिक्षेत्र

Web Title: Office stolen with stolen electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज