कार्यालय गुढी पाडव्याला बेशरमच्या पानाफुलांनी सजविणार कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST2021-03-18T04:13:22+5:302021-03-18T04:13:22+5:30

आम आदमी पार्टी आक्रमक, चांदूर रेल्वे ते कुऱ्हा मार्गाची दुरवस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंत्यांना निवेदन चांदूर रेल्वे : ...

Office Gudi Padwa will be decorated with shameless leaves | कार्यालय गुढी पाडव्याला बेशरमच्या पानाफुलांनी सजविणार कार्यालय

कार्यालय गुढी पाडव्याला बेशरमच्या पानाफुलांनी सजविणार कार्यालय

आम आदमी पार्टी आक्रमक, चांदूर रेल्वे ते कुऱ्हा मार्गाची दुरवस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग

उपविभागीय अभियंत्यांना निवेदन

चांदूर रेल्वे : चांदूर रेल्वे ते कुऱ्हा मार्ग हा अनेक वर्षांपासून अतिशय खराब झाला असून, सदर रस्ता हा जीवघेणा ठरत आहे. गुढी पाडव्यापर्यंत या रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला बेशरमची पानेफुले लावण्याचा इशारा आप नेते नितीन गवळी यांच्या नेतृत्वात उपविभागीय अभियंता कोवळे यांना बुधवारी निवेदनातून दिला.

चांदूर रेल्वे ते कुऱ्हा रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून, अनेक वृत्तपत्रांनी, प्रसार माध्यमांनीसुद्धा या समस्येला वाचा फोडली. मात्र, बांधकाम विभागाने अद्याप ठोस पाऊल उचलले नाही. उलट सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चांदूर रेल्वे शहरातील चांगले रस्ते वेगवेगळे रस्ते खराब करण्यात आले, असे निवेदनात नमूद आहे. याप्रसंगी गौतम जवंजाळ, चरण जोल्हे, विनोद लहाणे, नीलेश कापसे, गोपाल मुरायते, पंकज गुडधे, रोशन चांडक आदी उपस्थित होते.

Web Title: Office Gudi Padwa will be decorated with shameless leaves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.