शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

हुक्का पार्लरवर धाड, मालूपुत्र वरुणवर गुन्हा

By admin | Updated: May 10, 2017 00:03 IST

रेल्वेस्थानक ते बसस्थानक मार्गावरील "अड्डा २७" या हुक्का पार्लरवर सोमवारी पोलिसांनी धाड टाकली.

बजरंग दल : शनिवार, रविवारी डान्सबारहीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वेस्थानक ते बसस्थानक मार्गावरील "अड्डा २७" या हुक्का पार्लरवर सोमवारी पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला प्रवीण मालू यांचा पुत्र वरूण याने शिवीगाळ करीत धमकावल्याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हे नोंदविले. या हुक्का पार्लरमध्ये वरूण प्रवीण मालू याच्यासह एकूण पाच भागिदार असल्याचा आरोपही बजरंग दलाचे महानगर संयोजक निरंजन दुबे यांनी केला आहे. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री ‘बॉम्बे स्ट्रीट कॅफे’च्या वरील माळ्यावर असलेल्या ‘अड्डा २७" या हुक्का पार्लरवर धाड टाकल्याने शहरात खळबळ उडाली. पोलिसांनी हुक्का पार्लरची पाहणी करून परवान्याची तपासणी केली. यावेळी येथे अनेक तरूण-तरूणी हुक्क्याचे ‘कश’ घेताना आढळून आलेत. पोलिसांनी या तरूण-तरूणींचे बयाण नोंदविले असून परवान्याची सत्यता पडताळणी सुरु केली आहे. या हुक्का पार्लरचे धागेदोरे विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला खासगी कोचिंग क्लासेस चालविणारा शिक्षक मनोज पांडे याच्या रासलीलेशी जुळले असण्याची शक्यता पोलिस वर्तुळात चर्चेचा मुद्दा ठरला आहे. हुक्का पार्लरच्या आडून येथे काही गैरप्रकार सुरु असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धाड टाकली असल्याचा मुद्दा म्हणूनच ऐरणीवर आला आहे. विद्यार्थिनींना जाळ्यात ओढून त्यांच्याशी बळजोरीने संबंध ठेवणे, त्याचे व्हिडिओ क्लिप तयार करणे आणि त्याआधारे मुलींचा वारंवार वापर करणे, अशी पद्धती मनोज पांडे अवलंबित होता. मुले-मुली ओढतात हुक्काअमरावती : मनोजच्या कार्यपद्धतीत हुक्का पार्लरमधील विद्यार्थिनींशी सहवास, हा मुद्दाही समाविष्ट असल्याची माहिती बाहेर आली आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी सदर हुक्का पार्लरवर छापेमारी केल्याची माहिती आहे. बजरंग दलाला धमक्यापोलिसांच्या धाडीनंतर बजरंग दलाचे निरंजन दुबे हे काही वेळातच हुक्का पार्लरमध्ये पोहोचले. हुक्का पार्लरमध्ये आक्षेपार्ह कृत्ये चालत असल्याची माहिती दुबे यांनाही असल्यामुळे ते तेथे पोहोचले. निरंजन दुबे यांना पाहून हुक्का पार्लरच्या भागिदारांचे धाबे दणाणले. हॉटेल मालक प्रवीण मालू यांचा पुत्र वरूण याने निरंजन दुबे यांना ‘तु कशाला आला’, असा जाब विचारुन शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार दुबे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी वरुण मालूविरूद्ध भादंविच्या कलम ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला समज दिली आहे. हुक्का पार्लरमध्ये ३०० ते १ हजारापर्यंतच्या ४० चवींमध्ये हुक्का उपलब्ध आहे. मुले-मुली एकत्र बसून येथे हुक्का ओढतात आणि मुखातून धुराचे लोळ हवेत सोडतात. हा हुक्का तयार करण्यासाठी मुंबईचा जाणकार तरुण मुद्दामच आणण्यात आला आहे. ‘साऊन्ड पु्रफ’ सदर पार्लरला जाण्यासाठी तयार करण्यात आलेला रस्ता देखील भुलविणाराच आहे. पार्लरसाठी स्वतंत्र जीना तयार करण्यात आला आहे. चार जण जाऊ शकतील, अशा छोट्या उदवाहिनी (लिफ्ट)ची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्लरच्या अगदी प्रवेशद्वारासमोर या लिफ्टचे दार उघडते. पार्लरच्या दाराबाहेर ‘स्मोकिंग झोन’चा बोर्ड लावण्यात आला आहे. हुक्का पार्लर तिसऱ्या माळ्यावर असले तरी खाली मुख्य रस्त्यावर कर्मचारी तैनात असतात. तरुण-तरुणींना ते ‘मार्ग’दर्शन करतात. फोमच्या आवरणाने द्वारव्यवस्था ‘साऊन्ड पु्रफ’ करण्यात आली आहे. आत डिजेवर ठेका धरला जात असताना बाहेर त्याचा आवाज येऊ नये, त्यासाठी ही सोय करण्यात आली आहे.हुक्का पार्लर नव्हे, डान्स बारपोलिसांनी नियोजित धाडसत्र राबविल्याचा आरोप दुबे यांनी केला. धाड टाकण्यापूर्वीच पोलिसांनी मालू यांना सूचना दिल्याने पोलीस पोहोचण्यापूर्वीच हुक्का पार्लरमधील सर्व व्यवस्था सुधारण्यात आली होती, असा आरोप दुबे यांनी केला आहे. हुक्क्यातील मादक पदार्थांची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी एफडीएची मदत घेतली नाही. शनिवारी व रविवारी हे हुक्का पार्लर ‘डान्स बार’मध्ये रूपांतरित होते. पोलिसांना कल्पना असूनही मुद्दामच हे दोन दिवस वगळून धाड टाकल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे. सशस्त्र हल्ल्याची तयारीहुक्का पार्लरवर टाकलेल्या धाडीत पोलिसांना काही सापडले नाही. दरम्यान निरंजन दुबे हुक्का पार्लरमध्ये पोहोचले. यावेळी हुक्का पार्लरमध्ये कार्यरत कर्मचारी हॉकी स्टिक व स्टंपद्वारे सशस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप दुबे यांनी केला. मात्र, पोलिसांचा ‘वॉच’ असल्यामुळे ते हल्ला करू शकले नाहीत, असे दुबे यांचे म्हणणे आहे. पोलिस आयुक्तांनी हुक्का पार्लर तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आली. - प्रमेश आत्राम, पोलीस निरीक्षक