नागरिकांना आॅक्टोबर हिटचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 21:57 IST2018-10-03T21:57:37+5:302018-10-03T21:57:58+5:30

वातावरणातील बदलामुळे १५ दिवसांपासून अमरावतीकर नागरिक हैराण आहेत. वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, भर पावसाळ्यात नागरिक असह्य उन्हाचा अनुभव घेत आहेत.

October hit the citizens | नागरिकांना आॅक्टोबर हिटचा फटका

नागरिकांना आॅक्टोबर हिटचा फटका

ठळक मुद्देतापमान ३४ अंशांवर : कुलर पंख्यांचा वापर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वातावरणातील बदलामुळे १५ दिवसांपासून अमरावतीकर नागरिक हैराण आहेत. वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, भर पावसाळ्यात नागरिक असह्य उन्हाचा अनुभव घेत आहेत.
पहाटे हलका गारवा, दिवसभर कडाडून उन्ह आणि रात्रीच्या वेळी उकाडा यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम जाणवत आहे. साधारणत: ३० अंश असणारे कमाल तापमान ३४ च्या पुढे सरकले आहे. सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत कडक उन्हाचे चटके बसत आहे.
हस्त नक्षत्रात सर्वसाधारणपणे ऊन तापतेच आॅक्टोबर महिन्यात या नक्षत्राला सुरुवात होते. मात्र यावर्षी सप्टेंबरपासूनच कडक ऊन तापू लागले आहे. वातावरणातील दमटपणा कमालीचा वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत असून, नागरिक त्रस्त आहेत. शेतकऱ्यांना सध्या परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र पावसाची उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जिल्हावासीयांचा चिंता वाढली आहे. यावर्षी सप्टेंबरपासून तापमानात वाढ झाल्यामुळे आक्टोबरपूर्वीच हिटचे चटके नागरिक सहन करीत आहेत. दैनंदिन जीवनावर उन्हाचा परिणाम झाला असून दुपारच्या वेळी रस्ते सुनसान होत आहेत. दमट वातावरणाने नागरिक बेजार झाले असून, कुलर, पंख्यांचा वापर पुन्हा सुरू झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यात सध्या ३२ ते ३५ अशांपर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर उन्हाचा पारा दररोज वाढत चालला आहे.

Web Title: October hit the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.