रहदारीस अडथळा, हातगाडी चालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:12 IST2021-02-07T04:12:03+5:302021-02-07T04:12:03+5:30

अमरावती: सार्वजनिक ठिकाणी हातगाडी उभी करून इतर वाहनांना अडथळा निर्माण केला. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारत येत नव्हती. याप्रकरणी ...

Obstruction of traffic, crime on handcart driver | रहदारीस अडथळा, हातगाडी चालकावर गुन्हा

रहदारीस अडथळा, हातगाडी चालकावर गुन्हा

अमरावती: सार्वजनिक ठिकाणी हातगाडी उभी करून इतर वाहनांना अडथळा निर्माण केला. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारत येत नव्हती. याप्रकरणी नागपुरीगेट पोलिसानी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या हातगाडीचालकावर गुन्हा नोंदविला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. शेख सहीम शेख असलम (२२, रा. नमक कारखान्याजवळ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम २८३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

-----------------------------------------

सार्वजनिक ठिकाणी गॅस सिलिंडरचा वापर

अमरावती: सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रीची हातगाडी लावली तसेच त्या ठिकाणी लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत गॅस सिलिंडरचा वापर केल्याप्रकरणी एका व्यावसायिकाविरुद्ध गाडगेनगर पोलिसानी गुन्हा नोंदविला. प्रवीणनगर येथे २ जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. आरोपी शेख फईम वल्द शेख रशीद (३०) असे आरोपीचे नाव आहे. -------------------------------------------

रस्ता झाला, नाल्याची कामे प्रलंबित

अमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने पंचवटी ते इर्विन चौक मार्गावरील काँक्रीटीकरणाच्या रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून पूर्ण झाले. मात्र, रस्त्यालगत सांस्कृतिक भवननजीक नालीचे कामे प्रलंबित आहेत. सदर काम थंडबस्त्यात पडले आहे. अपघाताचा धोका असल्याने ते काम तातडीने करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

--------------------------------

Web Title: Obstruction of traffic, crime on handcart driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.