इसमास अश्लील शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST2021-03-13T04:22:55+5:302021-03-13T04:22:55+5:30

---------------------------------------------- तलवार घेऊन फिरणारा अटकेत अमरावती : रस्त्यावर तलावर घेऊन दहशद निर्माण करणाऱ्या आरोपीकडून राजापेठ पोलिसांनी तलवार जप्त केली. ...

This is obscene | इसमास अश्लील शिवीगाळ

इसमास अश्लील शिवीगाळ

----------------------------------------------

तलवार घेऊन फिरणारा अटकेत

अमरावती : रस्त्यावर तलावर घेऊन दहशद निर्माण करणाऱ्या आरोपीकडून राजापेठ पोलिसांनी तलवार जप्त केली. ही कारवाई अंबा विहार येथे गुरुवारी घडली. रोहीत गजानन जगताप (२०, रा. अंबाविहार )असे आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध कलम ४,२५ आर्म ॲक्ट सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदानुसार गुन्हा नोंदविला.

----------------------------------------------------------------

एसटी अपघातात इसम जखमी

अमरावती : एसटी बस भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून एका इसमाला धडक दिल्याने इसम जखमी झाल्याची घटना पंचवटी चौकातील बाबा कॉर्नर नजीक बुधवारी घडली. एमएच ४० व्ही ५९२८ च्या चालकावर गुन्हा नोंदविला. फिर्यादी व जखमी हमीद खान इब्राहीम खान (४८, रा. अलीमनगर) यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. सदर इमस कटल्यात प्लायुवडच्या सीट भरून राहटगावकडे जात असताना माहुरहून मोर्शीकडे जात असलेल्या बसने धडक दिली. यात फिर्यादी जखमी झाले. बसचालकावर गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

-------------------------------------------------------------

महिलेचा विनयभंग

अमरावती: पाठलाग करून एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना राजापेठ ठाणे हद्दीतील एका नगरात ७ मार्च रोजी घडली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध बुधवारी गुन्हा नोंदविला.

कैलास पुसदकर ( रा. यशोदानगर) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपीविरुद्ध भादविची कलम ३५४(अ),३५४(ड) नुसार गुन्हा नोंदविला. सदर आरोपी महिलेला गत सहा ते सात महिन्यापासून त्रास देतो व तिचा चोरून पाठलाग करतो.

--------------------------------------------------------------

Web Title: This is obscene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.