ओबीसी विद्यार्थ्यांना खुल्या जागेवर प्रवेश नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST2021-02-05T05:28:33+5:302021-02-05T05:28:33+5:30

अमरावती : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे येथील तंत्रनिकेतनच्या एका विद्यार्थ्याने अभियांत्रिकीच्या द्धितीय वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर केला ...

OBC students were denied admission to the open space | ओबीसी विद्यार्थ्यांना खुल्या जागेवर प्रवेश नाकारला

ओबीसी विद्यार्थ्यांना खुल्या जागेवर प्रवेश नाकारला

अमरावती : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे येथील तंत्रनिकेतनच्या एका विद्यार्थ्याने अभियांत्रिकीच्या द्धितीय वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर केला होता. त्याने ओबीसी संवर्गाचे प्रमाणपत्र जोडले असल्याने त्याला खुल्या जागेवर प्रवेश नाकारला जात असल्याचे वास्तव गुरुवारी समोर आले आहे. सीईटी प्रणाली प्रवेशाची परवानगी देत नसल्याचा आक्षेप आहे. सुमित अशोक देशमुख असे अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुमित याने तंत्रनिकेतनमध्ये डिप्लोमा केला आहे. याआधारे त्याने मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या द्धितीय वर्षासाठी अमरावती येथील पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी सीईटीकडे अर्ज केला होता. मात्र, सुमित हा गुणवत्ताधारक विद्यार्थी असल्याने त्याला खुल्या जागेवर प्रवेशाची संधी मिळाली. परंतु, त्याने सीईटीकडे प्रवेशासाठी जोडलेल्या शैक्षणिक कागदपत्रांमध्ये ओबीसी (कुणबी) अशी जातीची वर्गवारी नमूद केली. सुमित हा ओबीसीत असल्यामुळे खुल्या जागेवर प्रवेश घेता येणार नाही, असे सीईटीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे खुल्या जागेवर प्रवेशाची जागा निश्चित झाली असताना सुमीत देशमुख हा मागास विद्यार्थी असल्यामुळे सीईटी कक्षातून ऑनलाईन प्रवेशाची मुभा देत नाही. सुमित याने पोटे अभियांत्रिकीत खुल्या जागेवर प्रवेश मिळावा, यासाठी धाव घेतली. परंतु, सीईटी कक्षातून त्याचा प्रवेशाचा गुंता सुटला नाही, अशी माहिती आहे.

-----------------

गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना खुल्या जागेवर प्रवेश निश्चित झाला असल्यास तो कोणत्याही जाती, धर्माचा असल्यास महाविद्यालयास प्रवेश देणे ब्ंधनकारक आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय प्रवेश नाकारत असल्यास ही बाब गंभीर मानली जाईल. याविषयी तक्रार प्राप्त झाल्यास सीईटी कारवाई करेल.

- एस.के. महाजन, अभियांत्रिकी विभाग प्रमुख, सीईटी. मुंबई

----------------------

सुमित देशमुख याचा प्रवेश खुल्या जागेवर निश्चित झाला आहे. परंतु, सीईटी कक्षाने त्याच्या प्रवेशास परवानगी दिली नाही. यासंदर्भात सीईटी आयुक्तांकडे प्रवेशाबाबतची माहिती पाठविली आहे. सीईटी आयुक्तांच्या मार्गदर्शन आल्यानंतर प्रवेशाविषयी निर्णय घेतला जाईल. सीईटी प्रणाली प्रवेश स्वीकारत नाही.

- ए.पी. धांडे, प्राध्यापक, पोटे अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती

Web Title: OBC students were denied admission to the open space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.