अंगणवाडी केंद्रातील पोषण आहारात चवळीचा टक्का वाढणार

By Admin | Updated: February 3, 2016 00:22 IST2016-02-03T00:22:10+5:302016-02-03T00:22:10+5:30

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्हाभरातील अंगणवाडी केंद्रातून किशोरवयीन मुलींना दिले ...

Nutritional intake in the Anganwadi center will increase the cholera percentage | अंगणवाडी केंद्रातील पोषण आहारात चवळीचा टक्का वाढणार

अंगणवाडी केंद्रातील पोषण आहारात चवळीचा टक्का वाढणार

एकमताने ठराव : महिला व बालकल्याण समितीचा निर्णय
अमरावती : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्हाभरातील अंगणवाडी केंद्रातून किशोरवयीन मुलींना दिले जाणाऱ्या पोषण आहारात वाटाण्याचे प्रमाण कमी करून चवळीचा आहारात टक्का वाढवावा,असा ठराव मंगळवारी महिला व बालकल्याण समितीने घेतला.
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विषय समितीची सभा सभापती वृषाली विघे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयाला अनुसरून सभापतीच्या दालनात बोलविण्यात आली होती. राज्यातील निवडक जिल्ह्यात किशोरवयीन मुलींसाठी सबला योजना राबविण्यात येते. यामध्ये ११ ते १४ वयोगटातील शाळेत न जाणाऱ्या व १४ ते १८ वयोगटातील सर्व मुलींना अंगणवाडी केंद्रातून महिन्यातून दोन वेळा पोषण आहार पुरविण्यात येतो. यामध्ये वाटाणे चवळी व अन्य प्रदार्थ पोषण आहाराचे माध्यमातून दिले जातात. मात्र पोषण आहारात चवळीचा टक्का वाढविण्यात यावा, असा प्रस्ताव सभापती वृषाली विघे यांनी मांडला. सदरचा ठराव महिला व बालकल्याण आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. सभेत इयत्ता ५ ते १२ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी उपलब्ध केले जाईल. यासोबतच महिला व मुलींना डेस डिझायनिंग व ट्रिबल सी संगणक प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कारवाई करून निविदा प्रक्रीया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सभापती विघे यांनी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी कै लास घोडके यांना दिले आहेत. मार्चपर्यंत मुलींना सायकल वाटप व प्रशिक्षण देण्याची कारवाई प्रशासनाने पुर्ण करण्याचे निर्देश सुध्दा अधिकाऱ्यांना दिले आहेत.जिल्ह्यात सध्या ज्या ठिकाणी नवीन अंगणवाडी केंद्र इमारत बांधकाम सुरू आहे. अशा ठिकाणी संबंधित सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्यांना उदघाटन व भूमिपूजनास निमंत्रित करण्यात यावे अशा सूचनासुध्दा दिल्या आहेत. यावेळी सभेत महिला व बालकल्याण विभागाचा आढावा सभापतीनी घेतला. सदस्याचे प्रश्नावर सभेत विस्तुत चर्चा कषरून निर्णय घेण्यात आले. सभेला विद्या तट्टे, सुषमा कलाने, गीता चव्हाण, संगीता चक्रे, संगिता सवाइ आदी उपस्थित होते.

Web Title: Nutritional intake in the Anganwadi center will increase the cholera percentage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.