इर्विनमधील परिचारिका त्रस्त

By Admin | Updated: October 29, 2014 22:42 IST2014-10-29T22:42:54+5:302014-10-29T22:42:54+5:30

इर्विनमध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सांभाळताना परिचारिकांची चांगलीच दमछाक होत आहे. केवळ १३३ परिचारिका दररोज ४०० च्यावर रुग्णांची देखभाल करीत आहेत.

The nurses of Irvine suffer | इर्विनमधील परिचारिका त्रस्त

इर्विनमधील परिचारिका त्रस्त

अमरावती : इर्विनमध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सांभाळताना परिचारिकांची चांगलीच दमछाक होत आहे. केवळ १३३ परिचारिका दररोज ४०० च्यावर रुग्णांची देखभाल करीत आहेत. त्या दृष्टीने परिचारिकांचा ताण वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच इर्विन रुग्णालयातील अव्यवस्थेमुळे परिचारिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे इर्विन प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत.
जिल्ह्याभरातील गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याबाबत धुरा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची दुरवस्था दिवसेंदिवसे वाढतच आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना योग्य मार्गदर्शनाचा अभाव गेल्या कित्येक दिवसांपासून जाणवत आहेत. त्यातच आता अपुऱ्या मनुष्य बळामुळे अनेक कामे परिचारिकाच सांभाळत आहेत. प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देणाऱ्या परिचारिकांना रुग्णालयातील समस्यांचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयात ओपीडी, आयसीयु, आयओटी, ओटी व अन्य १६ वार्डामध्ये केवळ १३३ परिचारीका आरोग्य सेवा पुरवित आहेत. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात त्यांची दमछाक होत आहे.
त्यातच आरोग्य सेवा पुरविताना येणाऱ्या अडचणींचा सामना करताना परिचारिकांना सुरक्षेचा प्रश्न भेडसावत आहे. दिवसरात्र राबणाऱ्या या परिचारीकांना कधी रुग्ण तर रुग्णांचे नातेवाईक तर कधी मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे.
रुग्णालयात पुरुष कर्मचारी, बार्डबाय व सुरक्षा रक्षक आहेत. मात्र तरीसुध्दा परिचारिकांनावरच कामाचा मोठा ताण वाढत आहे. रुग्ण अधिक व परिचारिकांची संख्या कमी असल्यामुळे काही परिचारिकांनाच रुग्ण सेवेत मोठी कसरत करावी लागत आहे.
रुग्णालयातील असुविधामुळे रुग्ण परिचारिकांनाच त्रास देताना दिसून येत आहे. इर्विन रुग्णालयाची भिस्तच परिचारिकांवर अवलंबून असल्याचे दिसून येत आहे. काही परिचारिकांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले.

Web Title: The nurses of Irvine suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.