शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली
By Admin | Updated: May 2, 2015 00:25 IST2015-05-02T00:25:06+5:302015-05-02T00:25:06+5:30
राज्य शासनाकडून शासकीय व अनुदानित शाळांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो.

शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली
'कॅग'चे निरीक्षण : खासगी शाळांकडे अधिक कल
चांदूरबाजार : राज्य शासनाकडून शासकीय व अनुदानित शाळांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. तरीसुद्धा खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा लोंढा वाढत असल्याचे चित्र 'कॅग'च्या निरीक्षणावरुन दिसून आले आहे.
मागील दोन वर्षांत शासकीय व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सात टक्क्यांनी घटली आहे. त्या तुलनेत खासगी विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या २२ टक्क्यांनी वाढल्याचे 'कॅग'च्या अहवाल नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.
दिवसेंदिवस राज्यातील शिक्षणाचा दर्जा खालावत आहे. याबद्दल काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधी पक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. शाळांच्या इमारतीत, पायाभूत सुविधा, शिक्षकांच्या रिक्त जागा, त्यांच्या वेतनश्रेणीतील तफावत असून विविध विषयांवरही अधिवेशनात चर्चा पार पडली. नेमके त्याचवेळी 'कॅग'ने आपल्या अहवालात शासकीय अनुदानित शाळांपेक्षा, पालक व विद्यार्थी खासगी शाळांना अधिक पसंती देत असल्याचे वास्तव पुढे आले.
वर्षाकाठी राज्य शासनाचा शालेय शिक्षणावर २३ हजार कोटीहून अधिक रुपये खर्च होतो. तरीही विद्यार्थी खासगी शाळांकडे वळू लागले आहेत. हा 'कॅग'ने शासनासमोरच चिंतनासाठी ठेवलेला एक विषय आहे, असे या अहवालातून स्पष्ट होत आहे. विद्यार्थ्यांच्या शाळांमधील गळतीची, राज्य शासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.
स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थी
२०११-१२ - ८७ लाख ६० हजार ७६०
२०१३-१४ ६३ लाख ३४ हजार ७३०
अनुदानित शाळांमधील विद्यार्थी
२०११-१२ ६४ लाख ९६ हजार ३५ ४२०१३-१४ : ६३ लाख ५२०
खासगी विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थी
२०११-१२ - २८ लाख २९ हजार ९४
२०१३-१४ - ३४ लाख ४५ हजार ८१५