गरोदर मातांच्या मृत्यूचे प्रमाण घटले

By Admin | Updated: July 9, 2014 23:13 IST2014-07-09T23:13:21+5:302014-07-09T23:13:21+5:30

नऊ महिने आपल्या पोटच्या गोळ्याला जपणारी माता आजच्या काळात योग्य आरोग्य सेवेची अपेक्षा करीत आहे. त्याकरिता शासनाने वैद्यकीय सेवा व गरोधर मातांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

The number of pregnant mothers decreased | गरोदर मातांच्या मृत्यूचे प्रमाण घटले

गरोदर मातांच्या मृत्यूचे प्रमाण घटले

अमरावती : नऊ महिने आपल्या पोटच्या गोळ्याला जपणारी माता आजच्या काळात योग्य आरोग्य सेवेची अपेक्षा करीत आहे. त्याकरिता शासनाने वैद्यकीय सेवा व गरोधर मातांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे झाले आहे. मागील वर्षात सरासरी ०.१३ टक्के तर या वर्षात ०.०७ टक्के गरोदर मातांचे मृत्यूचे प्रमाण असून १८ महिन्यांत १५ गरोदर मातांचे मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरवर्षी या आकडेवारीत मोठी घट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. आज मातृ सुरक्षा दिनानिमित्त जिल्ह्यतील गरोदर मातांच्या सुरक्षेबद्दल घेतलेल्या आढावा.
स्त्रियांना मातृत्व मिळणे हे त्या स्त्रिकरिता जीवनातील सर्वात मोठी उपलब्धी समजली जाते. आपल्या अपत्याकरिता सतत ९ महिने झटणारी आई आजच्या युगात फार महत्त्वाची समजली जाते. मात्र त्यांना पुरविण्यात येणारी आरोग्य सेवा परिपूर्ण मिळत नसल्याने प्रसूत महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत मागील काही वर्षांमध्ये माता व बाल मृत्यू वाढल्याचे दिसून येत होते. मात्र आजच्या स्थितीमध्ये गरोदर मातेच्या मृत्यूच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ दरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालयात १० हजार ८७४ महिला प्रसूतीकरिता दाखल करण्यात आल्या. त्यापैकी ९ हजार ३० महिलांची प्रसूती झाली असून त्यामध्ये १३ महिलाचा मृत्यू झाला आहे. तसेच एप्रिल ते जून २०१४ मध्ये २ हजार८२४ महिलांना दाखल केले गेले. त्यापैकी २ हजार ५२६ प्रसूती झाल्या असून त्यामध्ये २ गरोदर महिलांचे मृत्यू झाले आहे. त्यामुळे दरवर्षी गरोधर मातांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The number of pregnant mothers decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.