अर्जांचा आकडा साडेतीन हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:56 IST2018-02-25T22:56:25+5:302018-02-25T22:56:25+5:30
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी पालकांनी सर्वत्र गर्दी झाली. आतापर्यंत ३ हजार ९०० अर्ज करण्यात आले.

अर्जांचा आकडा साडेतीन हजारांवर
आॅनलाईन लोकमत
अमरावती: आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी पालकांनी सर्वत्र गर्दी झाली. आतापर्यंत ३ हजार ९०० अर्ज करण्यात आले. पालकांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असल्याने यंदादेखील आरटीई प्रवेशासाठी मोठी चढाओढ राहण्याची चिन्हे आहेत.
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील बालकांसाठी असलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्हाभरातून आरटीई वेबसाईटवरून ही आॅनलाईन अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या केंद्रामधून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. अर्ज भरण्यासाठी आरटीईच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिकदुष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी विविध शाळांमध्ये २५ टक्के जागा राखून ठेवण्यात येतात. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना या जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. सुरूवातीच्या टप्प्यात शाळांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर आता १० ते २८ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. हे अर्ज सादर झाल्यानंतर लॉटरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नर्सरी, केजी १, आणि पहिल्या वर्गात प्रवेश दिले. जातील. आरटीई अंतर्गत विविध शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून इच्छुक पालकांनी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू केल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
अचूक माहिती भरा
गतवर्षी आरटीई २५ टक्क्याच्या कोट्यातून प्रवेशासाठी पालकांनी आॅनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी. काही तांत्रिक अडचण आल्यास शिक्षण विभागाशी संपर्क करावा. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार सदर आॅनलाईन प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
२३३ शाळांची नोंदणी
आरटीई अंतर्गत शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात २३३ शाळांची नोंदणी करण्यात आली आहे. ३ हजार ९०० जागांवर आरटीईमधून प्रवेश दिले जाणार आहेत.