एनएसयूआयची जिल्हा कचेरीवर धडक
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-25T01:13:31+5:302015-07-25T01:13:31+5:30
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक शुल्क माफ करावे या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

एनएसयूआयची जिल्हा कचेरीवर धडक
निवेदन : विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफ करा
अमरावती : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक शुल्क माफ करावे या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना देण्यात आले.
जिल्ह्यासह राज्यात दुष्काळी पविस्थिती असल्यामुळे बहूतांश विद्यार्थी शेतकरी कुटंूबातील आहेत.त्यामुळे त्याच्यासमोर शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळामुळे शेतात उत्पन्न झाले नाही. परीक्षा शुल्क व शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात अव्यवासायिक, व्यवसायिक, डिप्लोमा, इंजिनिअररिंग, मेडिकल व इतर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी एनएसयूआयने शासन व प्रशासनाकडे केली आहे. मात्र यावर ठोस तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा व शैक्षणिक शुल्क शासनाने विना विलंब माफ करावे, अशी मागणी यावेळी एनएसयूआयने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे. मोर्चात एन‘हयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष अक्षय भुयार, जिल्हाध्यक्ष ऋषिराज मेटकर, उपाध्यक्ष अमित महात्मे, आदित्य पेलांगडे, अनिकेत ढेंगळे, संकेत बोके, सागर कलाणे, ऋग्वेद सरोदे, रोहित देशमुख, मंगेश निभोंरकर, प्रणव लेंडे, केतन बारबुध्दे, गोपाल भांबुरकर, मयुर पानबुडे, शुभम बारबुध्दे, पवन गावंडे, ऋषिकेश गावंडे आदी सहभागी होते.