पोलीस पाटील भरतीसाठी होणार आता लेखी परीक्षा
By Admin | Updated: June 30, 2015 00:22 IST2015-06-30T00:22:18+5:302015-06-30T00:22:18+5:30
ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल या नंतर आता गावातील पोलीस पाटील पदे भरतांना लेखी व तोंडी परीक्षा उमेदवारांना द्यावी लागणार आहे़

पोलीस पाटील भरतीसाठी होणार आता लेखी परीक्षा
१४ हजार पदभरतीसाठी प्रक्रिया सुरू : अनुसूचित जाती, जमाती, महिलांना आरक्षण
मोहन राऊ त धामणगाव रेल्वे
ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल या नंतर आता गावातील पोलीस पाटील पदे भरतांना लेखी व तोंडी परीक्षा उमेदवारांना द्यावी लागणार आहे़ राज्यातील १४ हजार पोलीस पाटील पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरात दिली आहे़ दरम्यान पुढील महिन्यात या संदर्भातील उपविभागीय कार्यालय जाहीरनामा प्रसिध्द करण्याच्या प्रक्रीयेला सुरूवात करणार आहे़
गावातील सामाजीक, राजकीय वातावरण कायदा व सुव्यवस्था या बाबतचे गोपनीय अहवाल प्रशासनाला देण्याचे काम पोलीस पाटलामार्फत होत असते़ छोटे मोठे तंटे सोडविण्याचे आणि महसूल, पोलीस ठाणे यांच्या कार्यातील दुवा असणाऱ्या पोलीस पाटील पदाची संख्या पाच वर्षात घटली आहे़ गावांचा कारभार सांभाळतांना पोलीस पाटलांची दमछाक होत आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक गावात पोलीस पाटील भरण्याकरीता सुरूवात केली असून विभागीय आयुक्तांना त्या संदर्भात निर्देश दिले आहे़ राज्यातील २७ हजार ग्रामपंचायतीमध्ये दुप्पट खेड्याची संख्या आहे़ दहा वर्षात १४ हजार पोलीस पाटील पदे रिक्त झाली़
परीक्षा होणार लेखी, तोंडी
रिक्त असलेल्या गावातील पोलीस पाटील पद भरतांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती विशेष मागास प्रवर्ग या करीता पोलीस पाटील पदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे़ तसेच इयत्ता दहावी उत्तीर्ण , शेती व कोणत्याही गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्यात नसावी असे विवीध प्रमाण पत्र महत्वाचे आहे़
पुढील महिन्यात उपविभागातील ११० गावातील पोलीस पाटील पदाची भरती पारदर्शकपणे करण्यात येणार आहे़ त्याकरीता जाहीरनाम्या नंतर लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे़
-नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे.
पोलीस पाटील पद भरताना वारसांना प्राधान्य देणे गरजेचे आहे़ मागील अनेक वर्षा पासून रिक्त असलेले पोलीस पाटील पद भरण्याची प्रक्रीया होणार असल्याने आता गावांना न्याय मिळणार आहे़
-भिकाजी पाटील, अध्यक्ष, पोलीस पाटील संघटना