मिनिमंत्रालयातील फायलींची आता प्रतीक्षा संपली

By Admin | Updated: September 22, 2015 00:32 IST2015-09-22T00:32:26+5:302015-09-22T00:32:26+5:30

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत प्रभारी अधिकाऱ्यांवर प्रशासनाची धुरा सोपविल्याने कामकाजात ...

Now waiting for files in the ministries | मिनिमंत्रालयातील फायलींची आता प्रतीक्षा संपली

मिनिमंत्रालयातील फायलींची आता प्रतीक्षा संपली

सुनील पाटील रूजू : प्रभारी सीईओ लांडगे यांनी पदभार सोडला
अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत प्रभारी अधिकाऱ्यांवर प्रशासनाची धुरा सोपविल्याने कामकाजात जोखीमीचे कामे करताना येणाऱ्या अडचणीचा फटका महत्वाच्या फायलींना बसला होता.मात्र आता मुळ नियुक्तीवर असलेली मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी सोमवारी आपल्या पदाची सूत्रे स्विकारल्याने मिनिमंत्रालयातील प्रलंबीत फायलीचा मार्ग मोकळा आल्याने पदाधिकारी सदस्य यांच्या अडचणी दुर होणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील हे मागील ६ आॅगस्ट पासून म्हसुरी येथे ४५ दिवसांच्या प्रशिक्षणावर गेले होते. त्यांचा ६ सप्टेंबर रोजी प्रशिक्षणाचा कालावधी संपला आहे. त्यानंतर ते २० सप्टेंबरपर्यंत रजेवर असल्याने त्याचा कार्यभार विभागीय आयुक्त कार्यायातील आस्थापना विभागाचे उपायुक्त सुनील लांडगे यांच्याकडे अतिरिक्त सोपविण्यात आला होता. त्यामुळे त्यांना मुख्य जबाबदारीसह जिल्हा परिषदेचे कामकाज सांभाळावे लागत आहे. अशातच वरिष्ठ पातळीवरून दररोज घेण्यात येणाऱ्या बैठका आणि विविध विषयांवर होणाऱ्या व्हीडीओ कॉन्सफस आणि अन्य कामांचा ताण वाढत आहे. याच कामकाजात व दौऱ्यात अधिक वेळ जातो. जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या कामकाजा संबंधित महत्त्वाच्या फायली लांबणीवर पडत आहेत. विशेष म्हणजे लांडगे यांच्याकडे केवळ काही दिवसापर्यतच अतिरिक्त पदभार सोपविला असल्याने जिल्हा परिषदेतील पदाधिकारील सदस्य व विभागा प्रमुख यांच्या कडून मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे येणाऱ्या महत्वाच्या फायली पैकी काही फायली जोखमीच्या असल्याने याला हात न लावलेलाच बरा अशी अवस्था प्रभारी अधिकाऱ्यांची झाली होती. त्यानीच अशा फायलीचा निपटारा केला बरा अशा मानसिकतेत अधिकारी होते. त्यामुळे आता जोखीमीची कामे व महत्वाच्या प्रशासकीय कामकाजाच्या फायली सुनिल पाटील रूजू झाल्यामुळे मोकळया करण्याची प्रक्रीया २१ सप्टेबर पासून जिल्हा परिषदेत सुरू झाल्याने पदाधिकारी, विभाग प्रमुख यांच्या प्रलंबीत फायलीचा निपटारा विहीत वेळेत होणार आहे.

जिल्हा परिषदेतील प्रशासकीय कामकाज विहीत वेळेत मार्गी लावण्यासाठी प्रशासनाचा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडताना नेहमीच प्राधान्य आहे. त्याच दृष्टिकोनातून कामाच्या फायली योग्य पडताळणी करून निकाली काढल्या जातील.
- सुनील पाटील,
मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प.

Web Title: Now waiting for files in the ministries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.