आता ‘आयएएस’साठी प्रयत्न!
By Admin | Updated: July 5, 2015 00:15 IST2015-07-05T00:15:26+5:302015-07-05T00:15:26+5:30
जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या बळावर ‘यूपीएससी’चे कठीण ध्येय पार केल्याचा आनंद वेगळाच आहे.

आता ‘आयएएस’साठी प्रयत्न!
‘लोकमत’ मुलाखत : ‘यूपीएससी’उत्तीर्ण स्वप्नील वानखडेचे ध्येय
वैभव बाबरेकर अमरावती
जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या बळावर ‘यूपीएससी’चे कठीण ध्येय पार केल्याचा आनंद वेगळाच आहे. सुरूवातीला आयपीएस किंवा आयआरएसपैकी एका पदावर काम करण्याची संधी मिळेल. मात्र, येथेच थांबायचे नाही. पुढे आयएएसची परीक्षा देऊन जिल्हाधिकारी पदापर्यंतची मजल गाठायची आहे. हे स्वप्न आहे संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या अमरावतीच्या स्वप्निल गोपालराव वानखडे याचे. ‘लोकमत’शी संवाद साधताना ते बोलत होते.
करजगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या स्वप्नीलचे कुटुंब सध्या स्थानिक अशोकनगरात वास्तव्याला आहे. त्याचे वडील अंतोरा येथील दादुजी पेठे विद्यालयातून मुख्याध्यापक पदावरून नुकतेच निवृत्त झालेत. आई आशा गोपाल वानखडे यादेखील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ‘स्टाफ इनचार्ज’ म्हणून कार्यरत आहेत. स्वप्निलने बारावी उत्तीर्ण केल्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.