शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

आता कारागृहाचे कामकाज पेपरलेस, ई-ऑफिस प्रणाली लागू; निर्णय प्रक्रिया गतिमान, सुलभ होणार

By गणेश वासनिक | Updated: September 2, 2023 16:21 IST

गोपनीय पत्र वगळता इतर सर्व टपाल ई-ऑफीस प्रणालीच्या माध्यमातून पाठविले जाणार

अमरावती : राज्याचे मध्यवर्ती, जिल्हा कारागृहांचे कामकाज आता पेपरलेस होणार आहे. शासनाच्या सामान्य प्रशासनविभागाच्या निर्देशानुसार ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यात आली आहे. कारागृहाचे विभागीय कार्यालय मुख्यालय ते विभागीय कार्यालय, पुढे मंत्रालयातही गोपनीय पत्र वगळता इतर सर्व टपाल ई-ऑफीस प्रणालीच्या माध्यमातून पाठविले जाणार आहे.

शासकीय कामकाजात सुसूत्रता यावी, दस्तऐवज सुरक्षित राहावे आणि निर्णय प्रक्रिया गतिमान व सुलभ व्हावी याकरीता गृह विभागाने ई-ऑफिस प्रणाली लागू केली आहे. हल्ली गृह विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयाकडून टपाल डिजीटल स्वरुपात प्राप्त होत नसल्याने ई-ऑफीस प्रणालीद्वारे टपाल वितरण करताना ते स्कॅन करावे लागते. त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. परिणामी गृह विभागाच्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी गृह विभाग मंत्रालय येथे पाठवावयाचे गोपनीय पत्र वगळता इतर सर्व टपाल ई-ऑफीस प्रणालीच्या माध्यमातूनच यापुढे पाठवावे लागणार आहे.

अपर पोलिस महासंचालक तथा महानिरीक्षक (कारागृह व सुधार सेवा) अमिताभ गुप्ता यांनी ३० जून २०२३ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार कारागृह प्रशासनाचे कामकाज ई-ऑफिस प्रणाली आणि टपाल ई-ऑफिस प्रणालीद्वारे स्वीकारले जाईल, असे स्पष्ट केले आहे. केंद्र शासनाच्या एनआयसीने विकसीत केलेल्या ई-प्रिझम प्रणालीचा वापर अधिकारी, कर्मचाऱ्यांना करणे बंधनकारक आहे. बंदीजनाच्या दैनदिन कामकाजाच्या अनुषंगाने ई- प्रिझम प्रणालीमधील सर्व मॉड्यूल्स पूर्ण क्षमतेने कार्यान्वित विकसीत करण्यात आले आहे. राज्यात ९ मध्यवर्ती कारागृहे, २८ जिल्हा कारागृहे, एक विशेष कारागृह, नाशिक येथील एक महिला कारागृह, १९ खुली कारागृहे, वसाहत अशा विविध ६० कारागृहाचे कामकाज कामकाज पेपरलेस, ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यात आली आहे.राज्याच्या कारागृहात ६४५ विदेशी बंदी

राज्याच्या कारागृहात आजमितीला ६४५ विदेशी बंदी दाखल आहेत. विशेषतः मुंबई, नवी मुंबई व इतर मेट्रोपॉलिटन शहरातील कारागृहात विदेशी बंद्यांचे प्रमाण अधिक आहे. कारागृहात विशेषतः नायजेरियन, बांग्लादेश, केनिया, कोलंबिया, इराण, इराक, ब्रिटन, ग्रीस, गिनी,घाना, ब्राझील, थायलंड, युगांडा, चीन, पाकिस्तान, नेपाळ आदी देशांचे नागरिक विविध गुन्ह्यांमध्ये अटक होऊन दाखल झाले आहेत. विदेशी बंदीजनांच्या अनुषंगाने कारागृहाचे कामकाज पेपरलेस, ई-ऑफिस प्रणाली सोयीची ठरणारी आहे.

टॅग्स :jailतुरुंगPrisonतुरुंगonlineऑनलाइनAmravatiअमरावती