-आता प्रोटोकॉलनुसार कारोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:01 IST2020-08-29T05:00:00+5:302020-08-29T05:01:20+5:30
सध्या सर्वत्र कोरोना रुग्ण वाढत आहे. यासंदर्भाने चाचण्या करण्यासाठी ‘आयसीएमआर’ने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचना व संक्रमित रुग्णांचे स्वरुप पाहता चाचण्यांसाठी आता ‘अल्गोरिदम’ तयार करण्यात आलेले आहे. या सुचनेनुसार आता कोरोना संसर्गाचे चाचण्या करण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या व्यक्तींची तीन गटांत विभागणी करण्यात येणार आहे.

-आता प्रोटोकॉलनुसार कारोना चाचणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात एकाच रुग्णाच्या दोन ते तीन चाचण्या करण्यात येत असल्याने लॅबवरील ताण व शासनावरील आर्थिक भार वाढतो आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनूसार आता प्रत्येक व्यक्तीचा प्रोटोकॉल निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसारच चाचण्या कराव्यात. अधिकच्या चाचण्या करु नयेत, असे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी व आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
सध्या सर्वत्र कोरोना रुग्ण वाढत आहे. यासंदर्भाने चाचण्या करण्यासाठी ‘आयसीएमआर’ने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचना व संक्रमित रुग्णांचे स्वरुप पाहता चाचण्यांसाठी आता ‘अल्गोरिदम’ तयार करण्यात आलेले आहे. या सुचनेनुसार आता कोरोना संसर्गाचे चाचण्या करण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या व्यक्तींची तीन गटांत विभागणी करण्यात येणार आहे.
मनोरुग्णालयात दाखल होणाºया रुग्णांना एक आठवडा क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात यावे. त्यानंतर अॅन्टीजन चाचणी करावी आणि त्यानुसार आयसोलेशन वॉर्डमध्ये किंवा रुग्णालयातील संबंधित वॉर्डमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अश्या सूचना आहेत. याशिवाय तुरुंगात कैदी दाखल झाल्यानंतर एक आठवडा क्वारंटाईन करण्यात यावे. त्यानंतर अॅन्टीजेन चाचणी करण्यात यावी. चाचणीच्या निष्कर्षानुसार आयसोलेशन, कोविड रुग्णालयात संदर्भीत करणे याविषयीचा निर्णय घेण्यात यावा, अशा सूचना आहेत.
अशी आहे चाचण्यांची विभागणी
रॅपीड अॅन्टीजेन : ज्या व्यक्तींना उपचारासाठी त्वरीत चाचणीची आवश्यकता आहे. अशांची अॅन्टीजन चाचणी करण्यात यावी. आता अशा रुग्णाबाबत अर्धा तासांत निर्णय घेता येणार आहे.
आरटी-पीसीआर : ही चाचणी 'रॅपीड अॅन्टीजेन'चा अहवाल नकारात्मक आला असेल किंवा लक्षणे असणारे रुग्ण, पॉझिटिव्ह व्यक्तींचा हायरिस्क कॉन्टॅक्ट आणि परदेशातून येणाऱ्या व्यक्तींचीच करण्यात यावी.
ट्रुनेट : ‘ब्रॉट डेड’ व्यक्ती, बाळंतपणासाठी आलेल्या माता, ईमर्जन्सी ऑपरेशनचे रुग्ण, आदींची ‘ट्रुनेट चाचणी करण्यात यावी, असे निर्देश आहेत.