शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती कार्यक्षेत्राची आता १५ गणांत विभागणी, सहकार प्राधिकरणाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 16:10 IST

राज्यात ५३ बाजार समित्यांची मुदत संपत असल्याने राज्य सहकार निवडणूक प्रधिकरणाद्वारा निवडणूक घेण्याची लगबग सुरू झाली आहे. सहकार कायद्यातील नव्या बदलांनुसार आता मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

- गजानन मोहोड

अमरावती : राज्यात ५३ बाजार समित्यांची मुदत संपत असल्याने राज्य सहकार निवडणूक प्रधिकरणाद्वारा निवडणूक घेण्याची लगबग सुरू झाली आहे. सहकार कायद्यातील नव्या बदलांनुसार आता मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यंदा सर्व प्रचलित मतदरासंघ रद्द करण्यात आल्याने प्राधिकरणाच्या निर्देशांप्रमाणे संबंधित बाजार समिती क्षेत्राची समान १५ गणांत विभागणी करण्यात यावी, असे निर्देश प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी यांनी सर्व जिल्हाधिका-यांना दिले आहेत.राज्यात एकूण ३०७ कृषिउत्पन्न बाजार समिती आहे. यापैकी ५३ बाजार समित्यांमध्ये लवकरच निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये १९ बाजार समित्या विदर्भातील आहेत. या सर्व ठिकाणी नियम २०१७ अन्वये बदल करण्यात आल, तर १६ डिसेंबरच्या आदेशानुसार निवडणूक होणार आहे. यासाठी संबधित जिल्हाधिका-यांना जिल्हा निवडणूक अधिकारी असे प्राधिकरणाने घोषित केले आहे. यासर्व बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्राची आता समान १५ गणांत विभागणी करून, त्यापैकी पाच गणाचे लॉटरी पद्धतीने आरक्षण काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी, या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात किमान १० आर जमीन क्षेत्रधारणा केलेल्या व वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या शेतक-यांची मतदार यादी तयार करून संबंधित बाजार समित्यांच्या सचिवाला देण्याच्या सूचना प्राधिकरणाचे आयुक्तांनी केल्या आहेत. बाजार समिती कार्यक्षेत्राचे समान १५ भागांमध्ये विभाजन करताना पाच गण आरक्षित राहणार आहेत. यामध्ये दोन महिलांसाठी, एक अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती व एक नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि एक जागा विमुक्त भटक्या जमातीसाठी राहणार आहे. शेतकरी मतदारसंघातील राखीव गण लॉटरी पद्धतीने घोषित करण्यात येणार असल्याचे आयुक्यांनी स्पष्ट केले आहे.

विदर्भातील १८ बाजार समित्यांमध्ये धुमशाननागपूर जिल्ह्यातील काटोल, हिंगणा, कळमेश्वर, रामटेक, नरखेड, नागपूर व कामठी, यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा, दारव्हा, बोरी, पुसद, उमरखेड व  दारव्हा, चंदपूर जिल्ह्यात पोभुर्णा, गडचिरोली, गोंदिया तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा, मलकापूर व सिंदखेडराजा या बाजार समित्यांमध्ये नव्या सुधारणांनुसार निवडणूक होत आहे. याव्यतिरिक्त ठाणे जिल्ह्यात दोन, नाशिक तीन, नंदूरबार चार, पुणे एक, सोलापूर तीन, औरंगाबाद दोन, परभणी दोन, हिंगोली दोनला२तूर तीन, उस्मानाबाद तीन, बीड एक व नांदेड जिल्ह्यातील ११ बाजार समित्यांचा समावेश आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र